भारतात 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक खर्च करण्यासही तयार युझर्स; पहिल्याच वर्षी ४ कोटी ग्राहकांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 12:11 PM2021-05-16T12:11:28+5:302021-05-16T12:19:41+5:30

5G Services in India : 5G सेवांसाठी युझर्स अधिक खर्च करण्यासही तयार असल्याची माहिती अहवालातून आली समोर

सध्या देशात असलेल्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियासारख्या कंपन्या 4G सेवा पुरवत आहेत.

तर दुसरीकडे एमटीएनएल आणि बीएसएनसारख्या कंपन्या 3G सेवा पुरवत आहेत.

सध्या भारतात अनेक युझर्स 5G सेवांची वाट पाहत आहेत.

सध्या कोट्यवधी ग्राहक 5G सेवा घेण्यासाठी वाट पाहत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

ज्यावेळी देशात 5G सेवा लाँच होईल तेव्हा पहिल्याच वर्षी किमान 4 कोटी ग्राहक त्याचा वापर करतील असा अंदाज एका अहवालातून व्यक्त करण्यात आला.

Ericsson द्वारे करण्यात आलेल्या पाहणीतून हा अंदाज व्यक्त करण्यात आला.

यामध्ये 5G आल्यानंतर सध्या किती स्मार्टफोन युझर्स आहेत आणि त्यांच्यावर काय परिणाम होतील याचा अभ्यास करण्यात आला.

याशिवाय युझर्सना या तंत्रज्ञानाकडून काय अपेक्षा आहेत याची माहिती या सर्वेक्षणातून घेण्यात आली.

एरिक्सन इंडिया आणि नेटवर्क सोल्युशननं साऊथ ईस्ट इंडिया, ओशनिया अँड इंडियाचे प्रमुख नितीन बन्सल यांनी या अभ्यासातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आल्याचं म्हटलं.

काही भारतीय दूरसंचार कंपन्या 5G सपोर्टसाठी पहिल्यापासूनच काम करत आहेत. अशा परिस्थिती 5G सेवा लाँच केल्या तर पहिल्याच वर्षात किमान 4 कोटी ग्राहक यावर स्विच करतील असा अंदाज यातून व्यक्त करण्यात आला.

भारतीय ग्राहक 5G सेवांसाठी 50 टक्के अधिक रक्कमही देण्यास तयार आहेत,तर 5G कनेक्टिव्हीटीसाठी ते 10 टक्के प्रिमिअमही देण्यास तयार असल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

एरिक्सनच्या अहवालानुसार 67 टक्के ग्राहकांनी आपलं नेटवर्क 5G मध्ये अपग्रेड करण्याची इच्छा व्यक्त केलं. तसंच दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये ही संख्या 14 टक्के होती.

भारतात सर्वाधिक युझर्सना 5G सेवा वापरण्याची इच्छा असल्याचं बन्सल म्हणाले. तसंच ज्यांना यात अपग्रेड करायचं आहे त्यांपैकी 70 टक्के ग्राहकांना 4G पेक्षा अधिक स्पीड हवा असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

तर दुसरीकडे 60 टक्के फॅमिली मेम्बर्स अथवा काही डिव्हाईसेसद्वारे 5G डेटा शेअरिंगसारख्या सेवांचा लाभ घेऊ इच्छितात.

ज्या ग्राहकांना 5G सेवांचा आनंद घ्यायचा आहे, त्यापैकी अनेकज व्हिडीओ आणि मल्टिप्लेअर मोबाईल गेमिंगमध्ये आपल्या घालवत असल्याचीही माहिती समोर आली आहे.