Google Chrome चे 'हे' खास फीचर्स तुम्हाला माहितीयेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:45 PM2019-05-30T15:45:55+5:302019-05-30T15:53:33+5:30

इंटरनेटवर सर्व गोष्टी सर्च करण्यासाठी अनेक ब्राऊजर्स असतात. Google Chrome चा वापर करणाऱ्या अनेक युजर्सना त्यामध्ये असलेल्या काही फीचर्सबाबत माहिती नसते. मात्र आपलं काम सोपं करणारे काही फीचर्स गुगल क्रोममध्ये आहेत त्याविषयी जाणून घेऊया.

काम करताना युजर्स अनेक टॅब ओपन करतात. मात्र कधी कधी चुकून एखादा महत्त्वाचा टॅब बंद होतो. अशावेळी फक्त नवीन टॅब ओपन करून Ctrl+Shift सोबत T क्लिक करा.

एका टॅबवरून दुसऱ्या टॅबवर पटकन जाण्यासाठी Ctrl Key सोबत 1 पासून 9 पर्यंत वेगवेगळ्या टॅबवर जाता येतं.

एखादा मेसेज वाचताना मध्येच आपल्याला माहीत नसलेला एखादा शब्द येतो. त्यावेळी युजर्स त्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तो शब्द कॉपी करून सर्च करतात. मात्र असं करण्यापेक्षा तो शब्द सिलेक्ट करून राईट क्लिक करा. त्यानंतर गुगल सर्चचा ऑप्शन आपोआपचं येईल.

स्मार्टफोनमधील क्रोममध्ये एखादा शब्द सर्च करणं देखील सोपं आहे. जो शब्द शोधायचा आहे तो थोडावेळ प्रेस करा म्हणजे सिलेक्ट आणि कॉपीसारखा पर्याय मिळेल आणि ते सर्च करता येईल.

सिस्टम ओपन केल्यावर लगेच जर आपली आवडती साईट ओपन करायची असेल. तर क्रोम सेटींगमध्ये जाऊन on startup वर क्लिक करा. यामध्ये काही पर्याय दिसतील. ज्यामध्ये Open a specific page or set of pages वर टिक करा. त्यानंतर क्रोम ओपन केल्यावर तुम्हाला हवी असलेली साईट ओपन होईल.

Chrome चा Omnibox (नवीन टॅब ओपन केल्यावर जो address bar सारखा दिसतो) फक्त सर्च करण्यासाठी नाही तर गणितं सोडवण्यासाठी त्याचा वापर करता येतो.