90 वर्षीय 'गेमर ग्रँडमा'ची गोष्टच न्यारी; गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड भारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 04:05 PM 2020-05-26T16:05:42+5:30 2020-05-26T16:28:45+5:30
जगातील सर्वात वृद्ध युट्यूब गेमर असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. आवड माणसाला काहीही करायला अनेकदा भाग पाडते. काहींना पुस्तक वाचायला आवडतं तर काहींनी ऑनलाईन गेम खेळायला आवडतात. प्रत्येक जण आपली आवड जपण्याचा प्रयत्न करत असतो.
जपानमधील एका 90 वर्षांच्या आजींनी देखील हे खरं करुन दाखवलं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी ऑनलाईन गेम खेळून आजींनी एक नवा विक्रम केला आहे.
हमाको मोरी असं या आजींचं नाव असून त्यांना व्हिडिओ गेमची प्रचंड आवड असल्याने 'गेमर ग्रँडमा' या नावानेही ओळखलं जातं.
वयाच्या 39 व्या वर्षापासून त्यांनी गेम खेळायला सुरुवात केली आहे.
हातात रिमोट कंट्रोल घेऊन गेम्स खेळण्यात आजी दिवसभर मग्न असतात.
जगातील सर्वात वृद्ध युट्यूब गेमर असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
'ग्रँड थेफ्ट ऑटो 5' हा या आजींचा सर्वात आवडता गेम आहे.
2015 रोजी आजींनी एक युट्यूब चॅनल सुरू केलं. या चॅनलने जवळपास 2,50,000 सब्सक्रायबर्सचा टप्पा गाठला आहे.
एका महिन्यात त्यांनी 4 व्हिडीओ पोस्ट केले होते. गेमर आजींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
इतके वर्षे जगल्यानंतर मला असं वाटतंय की दीर्घ कालावधीसाठी गेम खेळण्याचा माझा निर्णय योग्य होता. मी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचा आनंद घेतेय असं आजींनी म्हटलं आहे.