98-inch 8K TV will come; The price will shock your eyes
तब्बल 98 इंचांचा 8K टीव्ही येणार; नुसती किंमतही डोळे विस्फारवणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 03:04 PM2019-04-25T15:04:29+5:302019-04-25T15:09:14+5:30Join usJoin usNext जगभरात सध्या 4K टीव्ही बाळसे धरत असताना सोनी कंपनीने तब्बल 8K TV लाँच केला आहे. महत्वाचे म्हणजे भारतात अद्याप एचडी रेडी आणि फुल एचडी हे टीव्ही मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. आणि 4K टीव्हीची किंमत पाहता ती तीस हजारांपासून लाखाच्या घरात असल्याने अद्याप या टीव्हींच्या विक्रीने गती पकडलेली नाही. अशातच सोनी कंपनीच्या या नव्या 8K TV ची किंमत पाहून डोळे विस्फारले नाहीत तर नवलच! नाविण्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या सोनी कंपनीने तब्बल 8 के चा 98 इंचाचा टीव्ही लाँच केला आहे. सोनीच्या मास्टर सिरिजच्या Z9G मध्ये हा टीव्ही सर्वात वरती आहे. जर या टीव्हीची साईज पाहून थक्क झाला नसाल तर किंमत खरेच डोऴे विस्फारणारी आहे. सोनीच्या या मोठ्ठ्या टीव्हीची किंमत तब्बल 50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सोनीची ही मास्टर सिरिज जून 2019 मध्ये बाजारात येणार आहे. कंपनीने या टीव्हीची किंमत $70,000 ठेवली आहे. जर या किंमतीकडे पाहाल तर तुम्हाला 4 के टीव्ही सोबत एखादी ऑडी किंवा बीएमडब्ल्यू कार खरेदी करता येईल. तरीही तुच्याकडे काही लाख रुपये उरतील. या टीव्हीमध्ये Sony X1 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर एकावेऴी 33 दशलक्ष पिक्सल्स ऑप्टीमाईज करू शकतो. सोनीच्या दाव्यानुसार X1 चिप 8K रिझोल्यूशनच्या प्रत्येक ऑब्जेक्टला नीट पडताळू शकतो. गेल्या आठवड्यातच सोनीने 2020 मध्ये येणारे Playstation 5 8K कंटेंटला सपोर्ट करणार असल्याचे सांगितले होते. सध्या 8K व्हिडिओ बाजारात उपलब्ध नसल्याने आणि त्याच्या किंमतीमुळे मध्यमवर्गाच्याही आवाक्याबाहेरचा हा टीव्ही आहे. यामुळे बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या 4K TV चा पर्याय जास्त सोईस्कर वाटतो. टॅग्स :टेलिव्हिजनTelevision