Airtel develops roadmap for 5G services in india Initially the service will start in big cities
Airtel ने तयार केला 5G सेवांचा रोडमॅप; सुरूवातीला 'या' शहरांमध्ये सुरू होणार सेवा By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 04:47 PM2021-02-07T16:47:54+5:302021-02-07T16:52:29+5:30Join usJoin usNext लवकरच आता देशात 5G सेवांचीही सुरूवात होण्याची शक्यता आहे. देशाच 5G सेवांच्या बाबतमीत एअरटेलनं आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकलं आहे. देशात सर्वप्रथम 5G सेवांची चाचणी करून Airtel नं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता कंपनीनं हे अत्याधुनिक तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी एक रोडमॅपही तयार केला आहे. देशात सर्वप्रथम 5G सेवांची सुरूवात मोठ्या शहरांपासून केली जाणार आहे. 5G सेवा या संपूर्ण देशात एकत्र लाँच केली जाणार नाही. यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबादसारख्या शहरांचा समावेश असू शकतो. सरकारकडून परवानगी मिळाल्यांतर त्वरितच या सेवा लाँच केल्या जातील अशी माहिती टेलिकॉमटॉकनं एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांच्या हवाल्यानं दिली. एअरटेलचं मोबाईल ब्रॉडबँड इन्फ्रास्ट्रक्चर फ्युचर प्रुफ आहे. हे नवी 5G सेवा त्वरित सुरू करण्यासाठी तयार तंत्रज्ञान आहे. 5G सेवा देशात सुरू करण्यासाठी कंपनी तयार असल्याचंही एअरटेलनं सांगितलं. कंपनीची 5G सेवा 4G च्या तुलनेत १० पट अधिक वेगवान असेल. कंपनीनं या सेवेची हैदराबादमध्ये चाचणी केली आहे. तसंच मोठ्या जीबीची एक मुव्ही अवघ्या काही सेकंदांमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. Airtel ची 5G सेवा हैदराबादमध्ये कमर्शिअली लाँच करण्यात आली आहे. स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर त्वरीत 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोपाल विट्टल यांनी दिली. 5G सेवांमध्ये 3Gbps पर्यंत डाऊनलोड स्पीड मिळू शकतो. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार 5G सर्व्हिस स्पेक्ट्रम अलॉटमेंटनंतर त्वरित ही सेवा सुरू केली जाईल. एअरटेलची ही 5G सेवा सर्व्हिस रेडिओ. कोअर आणि ट्रान्सपोर्ट डोमेनसाठी कंम्पॅटिबल असणार आहे. कंपनीनं 5G सेवांबाबतचा एक व्हिडीओदेखील युट्यूबवर शेअर केला आहे. टॅग्स :तंत्रज्ञानएअरटेलमोबाइलदिल्लीभारतमुंबईहैदराबादचेन्नईtechnologyAirtelMobiledelhiIndiaMumbaihyderabad-pcChennai