Airtel launches Xstream plan at Rs 499
Jio ला टक्कर, Airtel ने लाँच केला 499 रुपयांत Xstream प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 01:16 PM2020-09-07T13:16:05+5:302020-09-07T13:26:05+5:30Join usJoin usNext टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Airtel) नवीन एक्सस्ट्रीम (Xstream ) प्लॅन्स लाँच केले आहेत. 499 रुपयांपासून सुरू होणार्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा सुद्धा दिला जाणार आहे. अलीकडेच रिलायन्स जिओने 399 रुपयांपासून जिओफायबर (JioFiber )च्या नवीन योजनांची घोषणा केली आहे. त्यामुळे एअरटेल रिलायन्स जिओला टक्कर देण्याची शक्यता आहे. Airtel Xstream बंडल प्लॅनअंतर्गत कंपनी 1 जीबीपीएस पर्यंत स्पीड देणार आहे. यासह अनलिमिटेड डेटा, अँड्रॉइड 4K टीव्ही बॉक्स आणि सर्व OTT अॅप्सचे अॅक्सेस देणार आहे. 499 रुपयांच्या Airtel Xtream प्लॅनमध्ये 40Mbps वेग मिळेल. यासह डेटा अनलिमिटेड आहे. कॉलिंग देखील अनलिमिटेड आहे आणि एअरटेल Xtream 4K टीव्ही बॉक्स देखील दिला जाईल. या योजनेसह एअरटेलच्या OTT प्लॅटफॉर्मवर अॅक्सेस दिला जाणार आहे. दुसरा प्लॅन 799 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 100Mbps चा स्पीड मिळेल. तसेच, कंपनीने म्हटले आहे की, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग देण्यात येईल. यासह एअरटेल OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तिसरा प्लॅन 999 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200Mpbs चा स्पीड मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग देखील विनामूल्य मिळणार आहे. Airtel XStream व्यतिरिक्त इतर OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन केले जाणार आहे. यात Disney+Hotstar, Amazon Prime Video आणि Zee5 चा समावेश आहे. चौथ्या प्लॅन 1,499 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300Mbps च्या स्पीड सह डेटा आणि कॉलिंग अनलिमिटेड मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये सर्व OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. जे 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये आहेत. पाचवा प्लॅन 3,999 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 1Gbps च्या स्पीडसह डेटा आणि कॉलिंग अनलिमिटेड आहे. तसेच, OTT प्लॅनचे सब्सक्रिप्शन 1,499 रुपयांच्या प्लॅन सारखेच आहेत.टॅग्स :व्यवसायएअरटेलbusinessAirtel