Amazingly Interesting YouTube Facts You Should Know
YouTube बद्दलच्या 'या' रंजक गोष्टी माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 02:51 PM2019-09-11T14:51:30+5:302019-09-11T14:56:06+5:30Join usJoin usNext YouTube वर अनेक जण आपल्याला हवे असलेले व्हिडीओ पाहत असतात. युट्यूबबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. चाड हर्ले, स्टीव चेन आणि जावेद करीम या तिघांनी मिळून 14 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबची निर्मिती केली. गुगल नंतर युट्यूब जगातील दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. सुरुवातीला युट्यूबचं नाव Universal Tube,Rollforms ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर Utubeonline ठेवण्यात आलं. तर शेवटी Youtube असं ठेवलं. युट्यूबवर मिनिटाला अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. जगभरात दर मिनिटाला 100 तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. युट्यूबवर सर्वात पहिला व्हिडीओ 23 एप्रिल 2005 मध्ये अपलोड करण्यात आला होता. Me at the zoo असं त्याचं नाव असून त्यामध्ये युट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम देखील होते. युट्यूबवर Despacito हा व्हिडीओ सर्वात जास्त पाहिला गेला असून त्याला 6.1 बिलियन व्ह्यूज आहेत. अनेक देशांमध्ये युट्यूबला बंदी आहे. चीन, इराण आणि उत्तर कोरियामध्ये युट्यूब बॅन आहे टी सीरीज (T-series) हे जगातील नंबर वन युट्यूब चॅनल आहे. टी सीरीजचे जवळपास 97 मिलियन सब्सक्रायबर आहेत. टॅग्स :यु ट्यूबतंत्रज्ञानYouTubetechnology