Amazon Sale: फक्त 449 रुपयांमध्ये दमदार 5G Smartphone; सॅमसंग, रेडमी आणि ओप्पो फोन्सचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:52 PM2022-03-11T18:52:03+5:302022-03-11T18:58:10+5:30

Amazon Fab Phones Fest ची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये सॅमसंग, रेडमी, ओप्पो, रियलमी आणि आयकूसह अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट दिला जात आहे.

आज म्हणजे 11 मार्चपासून्र सुरु झालेल्या या सेलमध्ये अ‍ॅमेझॉनकडून थेट डिस्काउंट तर दिला जात आहे. सोबत बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरमुळे अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

iQOO चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर 22,990 रुपयांच्या ऐवजी 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच एक्सचेंज ऑफरमुळे 13,550 रुपये वाचतील. सोबत 1,500 रुपयांचा कुपन डिस्काउंट आणि एचडीएफसी बँकेच्या कार्ड्स वापरून 1000 रुपयांची सूट मिळेल. थोडक्यात iQOO Z3 5G स्मार्टफोन 1,940 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

या फ्लॅगशिप फोनची मूळ किंमत 74,999 रुपये आहे. अ‍ॅमेझॉनवर याची विक्री 36,990 रुपयांमध्ये सुरु आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 1,000 रुपयांची बचत करता येईल. तसेच 13,550 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरमुळे हा फोन 22,440 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Oppo A74 5G सर्व ऑफर्सचा वापर करून 2,440 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर करून 1000 रुपयांची सूट मिळवावी लागेल. तर 13,550 रुपयांच्या बचतीसाठी जुना फोन एक्सचेंज करावा लागेल. हा 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 16,990 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 20,990 रुपये आहे.

रेडमीचा हा 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु सेलमध्ये हा डिवाइस 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. त्यावर 15,199 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे, जिचा पुरेपूर फायदा घेतल्यास या फोनची किंमत फक्त 800 रुपये होईल.

हा 5G स्मार्टफोन 17,999 रुपयांच्या ऐवजी 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. सोबत 13,550 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 2 हजार रुपयांची कुपन डिस्काउंट मिळत आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर करून तुम्ही 1000 रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे हा स्मार्टफोन 449 रुपयांमध्ये विकत घेता येईल.