Amazon Great Republic Day Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी By सिद्धेश जाधव | Published: January 17, 2022 12:01 PM 2022-01-17T12:01:41+5:30 2022-01-17T12:16:16+5:30
Amazon Great Republic Day sale: Amazon India नं यंदाच्या पहिल्या सेलची सुरुवात केली आहे. Great Republic Days आज म्हणजे 17 जानेवारीपासून सुरु होणार असून हा सेल 20 जानेवारीपर्यंत चालेल. ज्यात अनेक स्मार्ट टीव्हीजवर अनेक ऑफर्स मिळत आहे. सोबत SBI कार्ड धारकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. Redmi 32-inch Smart LED TV अॅमेझॉन सेलमध्ये 24,999 रुपयांचा Redmi 32-inch Smart LED TV स्मार्ट टीव्ही 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जो Android TV 11 आधारित PatchWall 4 UI वर चालतो. यात IMDb इंटीग्रेशन, Google Assistant सपोर्ट आणि बिल्ट इन क्रोमकास्ट मिळतो. रेडमीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 20W चे स्पिकर DTX Virtual X आणि Dolby Audio सपोर्टसह देण्यात आले आहेत.
Mi 32-inch Smart LED TV Mi 32-inch Horizon Edition TV मध्ये Cortex A53 प्रोसेसरसह 1GB RAM आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. 20W स्पिकरसह DTS-HD टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Zee5 सारखे OTT अॅप्स मिळतात. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 19,999 रुपये आहे परंतु सेलमध्ये 13,999 रुपये देऊन हा विकत घेता येईल.
TCL 40-inch Smart LED TV अॅमेझॉन सेलमध्ये TCL च्या स्मार्ट टीव्हीवर अनेक ऑफर्स मिळत आहेत. यातील TCL 40-इंचाच्या Smart LED TV साठी तुम्हाला फक्त 20,490 रुपये द्यावे लागतील, ज्याची किंमत 39,990 रुपये आहे. या टीव्हीमध्ये Full HD रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. Android 9 वर चालणार हा टीव्ही ड्युअल कोर Mali 470 ग्राफिक्स प्रोसेसरवर चालतो.
OnePlus 43-inches Y Series TV OnePlus TV Y series 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये full-HD रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Dolby Audio सपोर्टसह 20W चे स्पीकर देण्यात आले आहेत. हा टीव्ही Android TV 9.0 वर चालतो आणि यात Netflix, Prime Video, Hotstar आणि अन्य स्ट्रीमिंग अॅप्स मिळतात. वनप्लसचा हा स्मार्ट टीव्ही 29,999 रुपयांच्या ऐवजी 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
iFFALCON 43-inch 4K Smart TV iFFALCON 43-inch 4K Smart TV मधील डिस्प्लेचे रिजोल्यूशन 4K Ultra HD आहे. हा टीव्ही 24 Watts चा साऊंड आऊटपुट देतो. 47,990 रुपयांचा हा टीव्ही 22,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Mi Horizon 40-inch Android TV या स्मार्ट टीव्हीमध्ये Full HD (1920×1080) रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि 3.5mm जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये 20W स्पीकर देण्यात आले आहेत. 29,999 रुपयांचा हा टीव्ही 20,499 रुपयांमध्ये मिळेल.
Vu 43-inch 4K Android TV 50 हजारांचा हा टीव्ही 23,499 रुपयांमध्ये मिळत आहे. हा Vu चा 4K स्मार्ट टीव्ही Android वर चालतो. यात Netflix, Prime Video, Youtube, Hotstar असे अनेक अॅप्स मिळतात. या टीव्हीमध्ये 30W चे स्पीकर देण्यात आले आहेत.
Acer 43-inch 4K Smart TV या टीव्हीमध्ये 4K Ultra HD डिस्प्ले देण्यात आला आहे. 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट असलेल्या या टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 64bit Quad Core प्रोसेसर देण्यात आला आहे. याची किंमत 34,999 रुपये असून सेलमध्ये 25,499 रुपये मोजावे लागतील.
AmazonBasics 50-inch 4K Android Fire TV अॅमेझॉन बेसिक्सचा हा टीव्ही अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आधारित Fire TV OS वर चालतो. 50-इंचाचा स्मार्ट टीव्ही Dolby Vision, HDR 10+, आणि अॅडव्हान्स पिक्चर प्रोसेसिंगसाठी 9th जेनेरेशन इमेजिंग इंजिन देण्यात आला आहे. यात क्वॉड कोर प्रोसेसर, 1.5GB रॅम आणि ऑडियो आउटपुटसाठी 20W Dolby Atmos स्पिकर मिळतात. 56,000 रुपयांचा हा टीव्ही 28,199 रुपयांमध्ये मिळेल.
Samsung 43-inch Crystal 4K Smart TV Samsung Crystal 4K सीरीज मधील 43-इंचाचा डिस्प्ले असलेला हा टीव्ही 36,740 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ज्याची किंमत 54,900 रुपये आहे. Samsung चा हा स्मार्ट टीव्ही Tizen OS वर चालतो, ज्यात 20W चे स्पिकर मिळतात.