android users 10 ways your smartphone will change this year
अँड्रॉइड फोन वापरता?; तुमच्या मोबाईलमध्ये 10 भारी फीचर्स येताहेत! By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 11:58 AM2019-05-08T11:58:46+5:302019-05-08T12:19:25+5:30Join usJoin usNext गुगल सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणत असतं. गुगलने आपल्या वार्षिक I/O 2019 कॉन्फरन्समध्ये लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमशी संबंधीत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. 13 ब्रँडच्या 21 स्मार्टफोन्समध्ये लवकरच नवीन Android Q येणार आहे. Android Q हे अँड्रॉइडचं दहावं व्हर्जन आहे. यामुळे मोबाईलमध्ये युजर्सना भन्नाट फीचर्स मिळणार आहेत. मोबाईलमध्ये येणाऱ्या या 10 भारी फीचर्सबाबत जाणून घेऊया. Android Q च्या मदतीने गुगल युजर्सच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणार आहे. युजर्सकडे सध्या स्वतंत्र प्रायव्हसी सेक्शन असणार नाही जेथे ते कॅलेडर, कॅमेरा आणि अॅप्स संदर्भात परवानगी देऊ शकतात. गुगलने Android Q मध्ये फोकस मोड अॅड केला आहे. कोणते अॅप्स तुमचं लक्ष हटवतात ते ठरवण्याचा अधिकार युजर्सकडे असणार आहे. म्हणजेच एखाद्या बातमीचे किंवा ईमेलचे नोटिफिकेशन तुम्ही कंट्रोल करू शकता किंवा निवडू शकता. तुम्ही फोकस मोडमध्ये असाल तेव्हा केवळ तुम्हाला हव्या असलेल्या महत्त्वाच्या गोष्टीच समजणार आहेत. Smart Reply फीचर देणारी मशीन लर्निंग आता अँड्रॉइड नोटिफिकेशन सिस्टममध्ये येणार आहे. ज्याच्या मदतीने मेसेजिंग अॅप नोटिफिकेशन्समध्ये स्मार्ट रिप्लाय दिसणार आहेत. “show silently” आणि “keep alerting” यासारखे पर्याय युजर्सना मिळणार आहेत. सुरक्षिततेशी संबंधित अनेक फीचर्स हे देण्यात येणार असून सेटींगमध्ये एक नवीन लोकेशन सेक्शन देखील मिळणार आहे. यामुळे युजर्सना लोकेशन डेटा कंट्रोल करता येणार आहे. कोणासोबत लोकेशन शेअर करायचं आहे हे युजर्स आता ठरवू शकतात. काही वेळी चुकून एखादा अॅप हा डिलीट केला जातो. मात्र Android Q मध्ये युजर्सना आपली चूक सुधारण्यासाठी म्हणजे तो अॅप मोबाईलमध्ये रिस्टोर करण्यासाठी काही सेकंदाचा वेळ मिळणार आहे. डार्क मोड फीचर हे युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते अनेक अॅपमध्ये येत आहे. गुगलने Android Q च्या मदतीने अँड्रॉइड फोनमध्ये “system wide” Dark mode रोल आऊट करणार आहे. म्हणजेच हे Dark mode हे आता काही अॅप्सपूरतं मर्यादित राहणार नाही. अँड्रॉइड युजर्सना फेसबुकच्या मेसेंजर अॅपमध्ये आपण ज्या पद्धतीने मेसेज पाहतो. त्याप्रमाणे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर circular notification दिसणार आहेत. Android Q सोबत अँड्रॉइड युजर्सना QR code च्या माध्यमातून वाय-फाय नेटवर्क शेअर करणं सोपं होणार आहे. तसेच युजर्स केवळ QR code स्कॅन करून वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात. एखाद्या व्हिडीओला डेटा कनेक्शन नसताना देखील live caption देणं आता Android Q मुळे शक्य होणार आहे. गुगलने Android Q मध्ये स्क्रीनशॉट्स अधिक edgier केले आहेत. अँड्रॉइडच्या येणाऱ्या व्हर्जनमध्ये स्क्रीनशॉट्सना notch सपोर्ट असणार आहे. टॅग्स :अँड्रॉईडगुगलतंत्रज्ञानमोबाइलAndroidgoogletechnologyMobile