Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 04:42 PM 2019-07-22T16:42:54+5:30 2019-07-22T16:49:00+5:30
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं.
आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. कसं ते जाणून घेऊया.
सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा.
चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा.
आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा.
चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही.
आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अॅक्सेस करता येतं.