iPhone 13 चा नवीन लूक पाहिल्यावर स्वतःहून खिशातून पैसे काढून द्याल; ‘हे’ प्रोडक्ट्सही झाले Apple Event मध्ये लाँच By सिद्धेश जाधव | Published: March 9, 2022 01:36 PM 2022-03-09T13:36:55+5:30 2022-03-09T13:44:29+5:30
Apple Event: अॅप्पलच्या ‘Peek Performance’ इव्हेंटमधून iPhone SE (2022), नवीन iPad Air, Mac Studio आणि iPhone 13 आणि iPhone 13 Pro चे नवीन कलर व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. Apple Event: अॅप्पलनं आपल्या ‘Peek Performance’ इव्हेंटमधून अनेक नवीन प्रोडक्ट सादर केले आहेत. कंपनीनं बहुप्रतीक्षित iPhone SE (2022) सादर केलाच परंतु सोबत iPad Air आणि Mac Studio देखील ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. कंपनीनं iPhone 13 आणि iPhone 13 Pro चा नवीन आकर्षक कलर व्हेरिएंट देखील सादर केला आहे.
iPad Air नवीन iPad Air मध्ये कंपनीनं लॅपटॉपमधील M1 चिपचा वापर केला आहे. या आयपॅडचे 64GB आणि 256GB असे दोन व्हेरिएंट मिळतील. कंपनीनं यात 5G नेटवर्क सपोर्टही दिला आहे. नवीन iPad Air च्या Wi-Fi Only मॉडेलची किंमत 54,900 रुपयांपासून्र सुरु होते. तर Wi-Fi + Cellular मॉडेलचा बेस व्हेरिएंट 68,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Mac Studio छोट्या फॉर्म फॅक्टरसह Mac Studio सादर करण्यात आला आहे. यात अॅप्पल च्या M1 Max आणि नवीन M1 Ultra चिपसेटचे पर्याय मिळतात. हे दोन्ही ऑप्शन कंपनीच्या 27-इंचाच्या iMac पेक्षा जास्त चांगली CPU आणि ग्राफिक्स परफॉर्मन्स देतील, असा दावा कंपनीनं केला आहे. 18 मार्चपासून Mac Studio ची 1,89,900 रुपयांच्या आरंभिक किंमतीत विकत घेता येईल.
Studio Display अॅप्पलनं कालच्या इव्हेंटमधून 27 इंचाची 5K रेटिना स्क्रीन अर्थात Studio Display सादर केला आहे. यात 14.7 मिलियन पिक्सल, 600 निट्स ब्राईट्नेस, P3 wide colour आणि True Tone टेक्नॉलजी देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये A13 Bionic चिपचा वापर करण्यात आला आहे. तसेच 12MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा सेंटर स्टेज सपोर्टसह देण्यात आला आहे. Studio Display येत्या 18 मार्चपासून विकत घेता येईल, ज्याची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरु होते.