अ‍ॅपल लवकरच देणार फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप युजरना जोरदार धक्का; कॉलिंग बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:05 PM2019-08-07T16:05:26+5:302019-08-07T16:10:12+5:30

अ‍ॅपल ही महागडे फोन बनविणारी कंपनी आयफोनमध्ये नवीन रिस्ट्रिक्ट फीचर जोडणार आहे. यामुळे Facebook Messanger आणि WhatsApp वरून VoIP कॉल्स रोखण्यात येणार आहेत.

म्हणजेच अ‍ॅपवरून इंटरनेट कन्क्शनद्वारे कोणालाही कॉल करता येणार नाहीत. याबाबतची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

या अॅपमधील कॉलिंग फिचर फोनच्या बॅकग्राऊंडला रन होत राहतात. कारण ही अॅप डेटा गोळा करून वेगात काम करू शकती.

अॅपल हाच बॅकग्राऊंड अॅक्सेस बंद करण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंटरनेट कॉल्सची सुविधा बंद होऊ शकते

मात्र, या फिचरची अॅपल आणि फेसबूककडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. अॅपलच्या या पावलामुळे फेसबूकला त्यांचे अॅप पुन्हा अपडेट करावे लागण्याची शक्यता आहे

यामुळे या फिचरचा परिणाम Facebook Messanger सोबत WhatsApp वरही होऊ शकतो. सध्या भारतासह अनेक देशांमध्ये व्हॉट्सअॅपवर कॉलिंग केले जात आहे.

VoIP म्हणजे Voice Over Internet Protocol चा वापर अॅनॉलॉग टेलिफोन लाइनसाठी केला जातो. यामध्ये कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय यूजर एकमेकांशी बोलू शकतात. मात्र, या साठी दोन्ही डिव्हाईस इंटरनेटशी जोडलेले असायला हवेत.

हे इंटरनेट मोबाईल डेटा किंवा वायफायची असावी लागते. खासकरून या फिचरचा वापर लांबच्या अंतरावर संपर्क साधण्यासाठी केला जातो. आजही अनेक युजर या सेवेचा वापर आंतरराष्ट्रीय कॉलिंगसाठी करतात. यामुळे अॅपलच्या या पावलामुळे ही सेवा प्रभावित होऊ शकते.