पेट्रोल-डिझेलवर हवाय डिस्काऊंट? 'हे' अॅप्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 06:33 PM2018-11-30T18:33:46+5:302018-11-30T18:43:38+5:30

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने घट होत आहे. इंधनाच्या किंमतीत सतत चढउतार हे पाहायला मिळतात. मात्र असे काही अॅप्स आहेत ज्यांच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलच्या बीलामध्ये बचत करता येते. अशाच काही अॅप्सविषयी जाणून घेऊया.

Smart Drive App हे भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (BPCL) चे आहे. या अॅपच्या मदतीने रोजच्या इंधन दराची माहिती मिळेल. तसेच हे अॅप जवळच्या पेट्रोल पंपासह तिथे मिळणाऱ्या सुविधांची माहिती देतं.

Daily Petrol/Diesel Price अॅपच्या मदतीने वेगवेगळ्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची माहिती मिळते. तसेच कोणत्या ठिकाणी पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळतं त्याबाबतही माहिती मिळते.

MapMyFuel या अॅपच्या माध्यमातून इंधन दराची माहिती मिळते. तसेच पेट्रोल-डिझेलच्या किंमती सोबतच CNG च्या बाबतही योग्य माहिती मिळते.

Daily Petrol-Diesel Price Update in India या अॅपच्या मदतीने वेगवेगळ्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दराची योग्य माहिती मिळते. तसेच इंधनाच्या दरात किती वाढ झाली याचीही माहिती मिळते.

​Paytm fuel cashback च्या मदतीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत थोडी बचत करता येते.

वेबसाईट्स - IOCL, BPCL आणि HPCL- कंज्युमर इंडियन ऑयलची वेबसाइट iocl.com पेट्रोल आणि डिझेलची किंमत समजते.