खूशखबर! आता WhatsApp वर इन्शुरन्स सुद्धा मिळणार; 2022 मध्ये येणार 'हे' 6 दमदार फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 01:06 PM2021-11-16T13:06:57+5:302021-11-16T13:30:36+5:30

Whatsapp 6 New Features : 2022 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप काही धमाकेदार फीचर्स आणणार आहे. तर काही फीचर्ससाठी अपडेट जारी करणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने आता युजर्सना आणखी एक खूशखबर दिली आहे.

पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप काही धमाकेदार फीचर्स आणणार आहे. तर काही फीचर्ससाठी अपडेट जारी करणार आहे. यामध्ये आता इन्शुरन्सचाही समावेश असणार आहे. इन्शुरन्ससह अनेक कामं करता येणार आहेत.

रिपोर्ट, 2022 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपला व्हॉट्सअ‍ॅप इन्शुरन्ससह एकूण सहा फीचर्स आणि अपडेट्स मिळतील. ज्याद्वारे इन्शुरन्ससह अनेक प्रकारची कामे व्हॉट्सअॅपवरून सहज करता येतील. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याची शैली बदलणार आहे. WhatsApp च्या नवीन फीचर्सबाबत जाणून घेऊया...

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना लवकरच डिलीट अकाऊट बटणाऐवजी WhatsApp Logout आणि मल्टी-डिव्हाइस फीचर सपोर्ट दिला जाणार आहे. व्हॉट्सअॅप लॉगआऊट फीचर युजर्सना दुसऱ्या डिव्हाइसवरून व्हॉट्सअ‍ॅप खाते लॉगआऊट करण्याचा पर्याय देईल. हे फीचर फेसबुकच्या लॉगआऊट फीचरप्रमाणे काम करेल.

इन्स्टाग्राम रिल्स सेक्शन लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्याद्वारे युजर्स थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून इन्स्टाग्राम रील्स पाहू शकतील.

व्हॉट्सअॅपद्वारे रिअल लेटर फीचरवर काम सुरू आहे. हे फीचर Archived Chats ची जागा घेईल. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनसाठी येईल. ही एक प्रकारे चॅट आर्काइव्हल सिस्टमचं इम्प्रूव्ह व्हर्जन असेल.

हे फीचर तुमची व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी वाढवण्यासाठी काम करेल. या फीचरच्या मदतीने, युजर्स last seen status बाबत निर्णय घेऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लवकरच इन्शुरन्स खरेदी करता येणार आहे. आरोग्य विमा आणि मायक्रो-पेन्शन Products भारतात WhatsApp द्वारे रोल आउट करण्यात येत आहे. यासाठी परवानाधारक आर्थिक सेवा करणाऱ्या प्लेयर्सची मदत घेतली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट कार्डसाठी नवीन डिझाइन आणू शकते. तुम्ही त्यावर टॅप केल्यावर तुमचे नाव त्यात दिसेल. तसेच व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट नवीन डिझाइनमध्ये सादर केला जाऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. युजर्सला कमालीचा चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनी अ‍ॅपमध्ये नेहमीच नवीन अपडेट आणत असते. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि एक व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी आहे.

WhatsApp ने या फीचरच्या रुपाने डेस्कटॉप फोटो एडिटरला आणले आहे. जे एक आवश्यक फीचर्स आहे. हे फीचर्स युजर्सला डेस्कटॉप अ‍ॅपच्या मदतीने फोटो सेंड करण्याआधी एडिट करण्याचा ऑप्शन देतो. याआधी हे काम पेंट किंवा अन्य एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागत होते. WhatsApp च्या या फीचर्सच्या मदतीने युजर्स स्टिकरला सुद्धा अ‍ॅड करू शकता.

कोणीही ऑनलाईन लिंक पाठवून कोणासोबतही चर्चा सुरू करू शकतो. लोक आपल्या मित्रांसोबत ते ऑनलाइन काय करीत आहेत. काय पाहतात, आणि काय ऐकत आहेत याबाबत बोलण्यास नेहमीच उत्सुक असतात. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या चॅटिंगच्या दरम्यान, लिंक प्रीव्ह्यूच्या ऑप्शनला बदलले आहे. युजर्स आता पूर्ण लिंक प्रीव्ह्यू पाहू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट दरम्यान स्टिकरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला सामान्य रूपाने योग्य स्टिकर शोधण्यासाठी अनेक टॅब मधून जावे लागते. कधी कधी हे स्टिकर मिळत नाहीत. ज्याला तुम्ही शोधत आहात. आता हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला चॅटिंग दरम्यान, आता स्टिकरचे सजेशन मिळेल. यावरून तुम्हाला एकदम योग्य स्टिकर वापर करण्यास मदत मिळेल