Are you safe on WhatsApp? Check it out
व्हॉट्सअॅपवर तुम्ही सुरक्षित आहात की नाही? असे तपासा By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 11:36 AM2019-11-26T11:36:43+5:302019-11-26T11:40:35+5:30Join usJoin usNext इस्त्रायलच्या पिगासस स्पायवेअर अॅटॅकमुळे गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप चर्चेत राहिले होते. या स्पायवेअरने जगभरातील पत्रकार आणि समाजसेवकांना एक मिसकॉल देऊन हेरगिरी केली होती. या हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपला याची माहिती मिळाली. याच क्लुप्तीने हॅकर्स एमपी4 व्हिडीओ पाठवून तुम्हाला लक्ष्य करून माहिती चोरू शकतात. यानंतर व्हॉट्सअॅपने युजरसाठी काळजी बाळगण्याचे आवाहन केले आहे. हॅकर व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरस असलेली एमपी 4 फाईल युजरना पाठवत आहेत. ही फाईल अन्य व्हिडिओ फाईलसारखीच सुरू होते. मात्र, पाठीमागिल बाजुला हॅकर्स तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस सुरू करून मोबाईलचा ताबा घेतात. यानंतर या मोबाईलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. व्हॉट्सअॅपने सांगितले आहे की, या कमतरतेनंतर कंपनीने या व्हायरस विरोधात कोडिंग केले असून नवीन अपडेट व्हर्जन लाँच केले आहे. हे व्हर्जन अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. अँड्रॉईड युजरना व्हॉट्सअॅपचे कमीतकमी 2.19.274 हे व्हर्जन अपग्रेड करावे लागणार आहे. तर आयफोन युजरना 2.19.100 हे व्हर्जन अपग्रेड करावे लागणार आहे. हे व्हर्जन पाहण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन हेल्पमध्ये अॅप इन्फो हा पर्याय आहे. यामध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअॅपचे व्हर्जनचा नंबर दिसतो. हा नंबर 2.19.274 पेक्षा जास्त असायला हवा. सध्याची अपडेट 2.19.347 ही आहे. टॅग्स :व्हॉट्सअॅपWhatsApp