Awesome! Now the Israeli drone will be manufactured in India, Adani's company will make it
जबरदस्त! आता भारतात तयार होणार इस्त्रायचा ड्रोन, अदानींची कंपनी बनवणार By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 02:56 PM2023-11-08T14:56:09+5:302023-11-08T15:02:54+5:30Join usJoin usNext इस्त्रायलचे खतरनाक ड्रोन आता भारतात तयार होणार आहेत. इस्त्रायचे हल्ला करणारे आणि हेरगिरी करणारे ड्रोनचा वापर आता भारतात केला जाणार आहे. आता भारतातच Hermes 900 MALE UAV तयार होणार आहे. भारतात याला अदानी डिफेंस कंपनी बनवत आहे. पुढच्या ४ ते ५ वर्षात हे भारतात मिळणार आहे. यामुळे देशात रोजगारही वाढणार आहे. भारतीय सैन्याला शस्त्रही मिळेल. हर्मेस 900 ड्रोनला आतापर्यंत इस्त्रायलची एलबीटी कंपनी बनवत आहे. या ड्रोनचे काम लक्ष ठेवणे आणि हेरगिरी करणे आहे. पण, वेळ पडली तर हल्लाही करु शकतो. हे ड्रोन ३० ते ३६ तास सतत उड्डाण करू शकते. हे एक मध्यम उंचीचे लाँग एन्ड्युरन्स मानवरहित हवाई वाहन आहे. ते जास्तीत जास्त ३० हजार फूट उंचीवर पोहोचू शकते. याचे वजन सुमारे ९७० किलो आहे. हे ४५० किलो वजनाच्या पेलोडसह ते उड्डाण करु शकते. याला चालवण्यासाठी दोघांची गरज आहे. हे संगणकाद्वारे नियंत्रित करता येते. त्याची लांबी सुमारे २७.३ फूट आहे. ते ताशी २२० किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. हे स्पाइक क्षेपणास्त्रासारखे दिसते. जगात या क्षेपणास्त्राचे ९ प्रकार आहेत. याचा गरजेनुसार ड्रोनमध्ये वापर करता येतो. हे क्षेपणास्त्र शत्रूची वाहने आणि टँक नष्ट करू शकते. यातील क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान इतके चांगले आहे की, शस्त्रू पळू शकत नाही आणि लपूनही जाऊ शकत नाही. हे क्षेपणास्त्र सध्या जगातील ३५ देश वापरत आहेत. स्पाइकची लांबी ३ फूट ११ इंच आहे. रूपांवर अवलंबून, ते कमी किंवा जास्त असू शकते. विविध प्रकारांची श्रेणी भिन्न आहे. त्याची श्रेणी ५० मीटर ते १० हजार मीटर पर्यंत आहे. हेलिकॉप्टर ६०० ते २५ हजार मीटरच्या पल्ल्याच्या स्पाईक-एनएलओएस क्षेपणास्त्राने सुसज्ज असेल. इस्रायलने जुलै २०१४ मध्ये ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एजमध्ये पहिल्यांदा या ड्रोनचा वापर केला होता. तर २०१५ च्या अखेरीस ते आपल्या सैन्यात तैनात करण्यात आले होते. पाळत ठेवणे, हेरगिरी करणे, पळून जाणाऱ्या लक्ष्यांचा शोध घेणे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि कोणत्याही प्रकारच्या हवामानात शत्रूवर लक्ष ठेवणे हे या ड्रोनचे मुख्य कार्य आहे. हा ड्रोन सिग्नल अडवून हेरगिरी करण्यासही सक्षम आहे. कम्युनिकेशन इंटेलिजन्समध्येही याचा उपयोग होईल. म्हणजेच परदेशी संदेशांचे सिग्नल ट्रेस करून ते डीकोड करण्यात मदत होईल. भविष्यात अदानी डिफेन्स हर्मीस 900 तसेच 450 बनवू शकते. त्यामुळे जगाला भारतात बनवलेले ड्रोन मिळू शकतील.टॅग्स :भारतीय जवानइस्रायलअदानीIndian ArmyIsraelAdani