लवकरच येतेय बजाजची 'क्यूट' कार, मायलेजही दमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 15:55 IST2018-11-23T12:51:46+5:302018-11-23T15:55:36+5:30

टाटा नैनोपेक्षाही लहान असलेली Bajaj Qute ही चारचाकी आता लवकरच रस्त्यावर धावणार आहे. कारण, परिवहन मंत्रालयाने या गाडीला मंजुरी दिली आहे.

बजाजची ही क्यूट कार ग्राहकांना केवळ 1.5 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत ही कार मिळणार आहे.

'मारुती अल्टो 800 आणि रेडी-गो' यांसारख्या चारचाकी गाड्यांना या कारचे आव्हान असणार आहे.

Bajaj Qute कारमध्ये 216.6 cc चे सिंगल सिलिंडर फ्यूल इंजेक्टेड इंजन आहे. ज्यामुळे 13bhp पॉवर आणि 20Nm टॉर्क असेल.

कारमध्ये 5 स्पीड सीक्वेंशल गियरबॉक्स असणार असून टॉप स्पीड 70kmph राहिल. या कारमधून चारजण आरामात प्रवास करु शकतील.

या कारचे वजन केवळ 400 किलोग्रॅम असून उंची 2.75 मीटर तर रुंदी 1.3 मीटर एवढी आहे.

लूक हलकाफुलका असलेली ही कार प्रतिलिटर 35 किमी धावणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशात जास्त मायलेज देणारी ही कार आहे.

या कारची ऑटोमोबाईल बाजारात लाँचिंगपूर्वीच जारोदार चर्चा सुरू आहे. तर ग्राहकांनाही कारबाबत अधिक उत्सुकता लागली आहे.