सावधान! मोटरसायकल चालविताना स्मार्टफोन कॅमेरा डॅमेज होऊ शकतो; Apple चा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 03:30 PM 2021-09-12T15:30:13+5:30 2021-09-12T15:35:29+5:30
Apple warning to motorcyclist's: जगातील सर्वात महागडे स्मार्टफोन बनविणारी कंपनी अॅपलने ग्राहकांना महत्वाचा इशारा दिला आहे. जगातील सर्वात महागडे स्मार्टफोन बनविणारी कंपनी अॅपलने ग्राहकांना महत्वाचा इशारा दिला आहे. जे लोक आपले मोबाईल मॅप वापरण्यासाठी मोटारसायकलच्या होल्डरला लावतात त्यांच्या मोबाईलचा कॅमेरा खराब होण्याची दाट शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. हे अॅपलच्याच बाबतीत नाही तर अन्य मोबाईल कंपन्यांच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. (Apple says motorcycle vibrations can damage iPhone cameras)
गुगल मॅप किंवा नेव्हिगेशन वापरताना आपण मोबाईल कारमध्ये किंवा मोटारसायकलवर होल्डरला लावतो. कारमध्ये एवढी कंपने जाणवत नाहीत. परंतू मोटारसायकलवर खूप जास्त कंपने (व्हायब्रेशन) जाणवतात. यामुळे कॅमेराची सिस्टीम खराब होऊ शकते.
जर तुमचा फोन एका ठराविक फ्रक्वेंन्सीच्या रेंजमध्ये हाय व्हायब्रेशनवर राहत असेल तर उच्च क्षमतेच्या मोटारसाकल सुरु असताना जी व्हायब्रेशन जाणवतात त्यातून कॅमेरा खराब होऊ शकतो.
कॅमेरामध्ये देण्यात आलेली ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) खराब होऊ शकते. अॅपलच्या म्हणण्यानुसार ओआयएस हे दीर्घकाळासाठी तयार करण्यात आले आहे. मात्र, जास्त काळ व्हाब्रेशनमध्ये राहिल्यास त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते.
OIS सिस्टीम देणाऱ्या अनेक मोठमोठ्या ब्रँडमध्ये हेच घडते. यामुळे ओआयएस डीग्रेड होते, आणि त्याचा परिणाम तुम्ही घेत असलेल्या फोटो, व्हिडीओवर होतो. यामुळे तुम्ही तुमचे आयफोन, स्मार्टफोन जास्त व्हायब्रेशनच्या संपर्कात ठेवणे टाळावे असा सल्ला कंपनीने दिला आहे.
खासकरून जास्त सीसीच्या बाईकमुळे ही समस्या उद्भवू शकते. सुपरबाईक, बुलेट सारख्य़ा बाईकमध्ये हे व्हायब्रेशन जास्त असते. हे व्हायब्रेशन हँडलबार आणि इंजिन, चेसिसद्वारे तयार होते.
छोट्या स्कूटर, मोपेडमध्ये देखील कमी तीव्रतेचे व्हायब्रेशन निर्माण होते. यामुळे टु व्हीलरना मोबाईल जोडू नये असे कंपनीने म्हटले आहे. जेणेकरून तुमच्या फोनचा कॅमेरा चांगला राहिल.