Become a techno savvy in the new year! These gadgets will help you to see difference from others
नव्या वर्षात टेक्नोसेव्ही व्हा! ही गॅजेट्स तुम्हाला करतील मदत By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 10:48 AM2019-12-30T10:48:27+5:302019-12-30T10:54:37+5:30Join usJoin usNext आज टेक्नॉलॉजिचा जमाना आहे. ऑफिस, कार्यक्रमांमध्ये वावरताना आता कपड्यांबरोबर स्टेटस सिम्बॉल म्हणून तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे, कोणते घड्याळ आहे याकडे पाहिले जाते. याचबरोबर तुमची कामे कशी झटपट होतील याकडेही पहावे लागते. अशी काही गॅजेट्स आहेत जी तुमच्याकडे हवी असतात, तुमचे दैनंदिन काम सोपे करतात. ब्ल्यूटूथ की-बोर्ड कॉम्प्युटर, लॅपटॉपसमोर बसून टाईप करावे लागते. कारण की बोर्ड त्याला जोडलेला असतो. यामुळे अंगही आखडून येते. पण ब्ल्यूटूथ की-बोर्ड घेतल्यास ही समस्या सुटते. तुम्ही आरामात बसून काम करू शकता. तसेच वायरच्या जंजाळातूनही सुटका होते. माऊसही आता ब्ल्यूटूथचे आलेले आहेत. शिवाय हा ब्ल्यूटूथ की बोर्ड टीव्ही, मोबाईललाही जोडता येतो. अॅमेझॉनवर हे की बोर्ड 1499 रुपयांपासून उपलब्ध आहेत. कॉर्डलेस ट्रीमर रोजरोज दाढी करायचा कंटाळा असतोच. पण कोरिव दाढी असेल तर ती रोजचे रोज शेपमध्ये ठेवावी लागते. यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीमर येतात. एमआयनेही ट्रीमर बाजारात आणला आहे. हा ट्रीमर वॉटरप्रूफही आहे. तसेच 40 सेटिंगही आहेत. याची किंमत 1199 रुपये आहे. वायरलेस इअरपॉड्स आज बऱ्याचजणांच्या कानामध्ये वायरलेस इअरपॉड्स दिसतात. विचार येतो किती महाग असतील. बोस, सिन्हेजर सारख्या कंपन्यांचे इअरपॉड १० हजारापासून पुढे 30, 40 हजाराला मिळतात. मात्र, काही कंपन्यांचे इअरपॉड चांगल्या दर्जाचे पण कमी किंमतीत मिळतात. बोट कंपनीचे इअरपॉड चांगला आवाज ऐकवतात. तसेच त्यामध्ये 305 तासांचा बॅकअप देणारी बॅटरीही आहे. या इअरपॉडची किंमत 3499 रुपये आहे. इको डॉट स्मार्ट स्पीकर इको डॉट स्मार्ट स्पीकर हा फक्त स्पीकरच नाही. त्याच्यामध्ये अॅ लेक्सा इनबिल्ट आहे. याशिवाय तुमच्या आवाजाने स्मार्ट डिव्हाईस नियंत्रितही करता येतात. तसेच अलेक्सा गार्ड हे तुमच्या घरात काही चुकीचे घडत असल्यास त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. तसेच तुमच्या आवडीची गाणी ऐकवणार आहे. हे बहुपयोगी गॅजेट 3999 रुपयांना उपलब्ध आहे. हेडफोन विथ माईक अनेकदा गाणी ऐकण्यासाठी चांगला आवाज ऐकविणारे हेडफोन सापडत नाहीत. कर्णकर्कष आवाजामुळे काही वेळातच डोके दुखायला लागते. प्रवासावेळी किंवा निवांत क्षणी नॉईस प्रूफ हेडफोन असल्यास किती छान वाटेल. हा अनुभव तुम्हाला जेबीएलचे हेडफोन देऊ शकणार आहेत. हा हेडफोन वायरलेस असून ११ तासांचा प्लेटाईम देतो. तसेच यामध्ये माईकही असल्याने फोन कॉलही घेता येणार आहेत. या हेडफोनची किंमत 2549 रुपये आहे. मोबाईल गेम कंट्रोलर जर तुम्ही गेम खेळण्यासाठी वेडे असाल तर तुमच्यासाठी हे गॅजेट एकदम परफेक्ट आहे. मोबाईल स्क्रीनवरील बटने दाबून बोटे दुखू लागतात. यासाठी वायरलेस मोबाईल गेम कंट्रोलर सोईचा ठरतो. शिवाय हा कंट्रोलर टॅब्लेट, टीव्ही, बॉक्सेस आदी गॅजेटनाही वापरता येतो. हे गॅजेट 999 रुपयांना उपलब्ध आहे. फायर टीव्ही स्टीक अॅमेझॉनने इंटरनेटद्वारे टीव्ही पाहता यावा यासाठी फायर टीव्ही स्टीक आणली आहे. यामुळे नेटफ्लीक्स, हॉटस्टार, प्राईमसारखे अॅपवरील व्हिडीओ पाहता येणार आहेत. फायर स्टीक ४के मध्ये अलेक्सा इनबिल्ट आहे. 3999 रुपये एवढी किंमत आहे. स्मार्ट वॉच स्मार्ट वॉच आपल्याला वेळेसोबतच आरोग्याचीही माहिती देते. किती चालला, बीपी किती आहे, कॅलरी काऊंट आदीची माहिती पुरवविते. शिवाय कॉल आणि मॅसेज हे आहेतच. काही स्मार्टवॉच ही 5 हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. पोर्टेबल चार्जिंग स्टेशन घरातील प्रत्येकाकडे दोन ते तीन गॅजेट्स असतातच. यामुळे चार्जिंग करण्याची समस्या निर्माण होते. कारण चार्जिंग पॉईंट कमी असतात. यामुळे एकाचवेळी 6 वेगवेगळी गॅजेट चार्ज करता येणारे चार्जिंग स्टेशनही उपलब्ध आहे. यामध्ये 4 अॅपलचे डिव्हाईस, 1 टाईप सी, 1 मायक्रो युएसबी केबल देण्यात आली आहे. जेव्हा डिव्हाईस फूल चार्ज होते तेव्हा ते आपोआप चार्जिंग थांबविते आणि इंडिकेटर सुरू करते. टॅग्स :अॅमेझॉनamazon