best 5 smartphones for low light photography
कमी प्रकाशातही 'या' स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून येतात जबरदस्त फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 04:27 PM2018-11-29T16:27:45+5:302018-11-29T19:31:45+5:30Join usJoin usNext स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या स्मार्टफोनमध्ये दमदार फिचर्स आणि कॅमेरा देत असतात. फोटो काढण्याची आवड असणारी मंडळी स्मार्टफोन कॅमेऱ्यासाठी विकत घेतात. कमी प्रकाशात जबरदस्त फोटो येणाऱ्या स्मार्टफोनबाबत जाणून घेऊया. Xiaomi Redmi 5 या फोनमध्ये 12 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच f/2.2 अपर्चर आणि 1.25um पिक्सेल पिच देण्यात आल्यामुळे या स्मार्टफोनमध्ये कमी प्रकाशात चांगले फोटो येतात. Nokia 7 Plus या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये वाईड अपर्चर f/1.75 आणि 1.4um लार्ज पिक्सल पिच देण्यात आला आहे. Xiaomi Redmi 5 Pro या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसहीत 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्यूल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी एलईडी फ्लॅशसोबतच 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Asus Zenfone 5z या स्मार्टफोनमध्ये 12+8 मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामधून कमी प्रकाशात उत्तम फोटो काढता येतात. OnePlus 6 या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच वन प्लसने स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्डींगचीही माहिती दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये एक व्हिडीओ एडिटरही आहे.टॅग्स :असूस मोबाइलतंत्रज्ञानशाओमीवनप्लस मोबाईलनोकियाAsus PhonetechnologyxiaomiOneplus mobileNokia