best 5g smartphones under 12000 check price specs in samsung tecno lava infinix brand handsets
जबरदस्त! १२००० रुपयांत 5G स्मार्टफोनचे 'हे' पर्याय; कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स अप्रतिम By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:29 PM2023-08-02T12:29:43+5:302023-08-02T12:33:45+5:30Join usJoin usNext काही महिन्यांपूर्वी देशात 5G सेवा सुरू झाली आहे. देशात काही दिवसापूर्वी 5G सेवा सुरू झाली आहे. देशातील अनेक ठिकाणी 5G सुरूही झाले आहे, यासाठी आता ग्राहकांनी 5G मोबाईल खरेदी करण्यासही सुरुवात केली आहे. कमी बजेटमध्येही तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. यामध्ये अनेक कंपन्यांचे हँडसेट उपलब्ध आहेत. जर बजेट जवळपास १२ हजार रुपये असेल, तर तुम्ही नवीनतम लॉन्च केलेल्या स्मार्टफोनसह तुमच्या आवडीचा फोन खरेदी करू शकता. Samsung Galaxy M13 5G: तुम्ही सॅमसंग ब्रँडचा हा 5G स्मार्टफोन या बजेटमध्ये खरेदी करू शकता. रिलायन्स डिजिटलवर त्याची (4 GB + 64GB स्टोरेज) किंमत सध्या 11,499 रुपये आहे. यात 6.5 इंच डिस्प्ले, 50 MP + 2 MP रियर कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आहे. Infinix HOT 20 5G: हा Infinix स्मार्टफोन तुमची पसंती बनू शकतो. Amazon वर (Blaster Green, 64 GB) (4 GB RAM) व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. यामध्ये तुमच्याकडे 6.6 इंच डिस्प्ले, 50MP + AI लेन्स, 8MP फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आहे. Lava Blaze 5G: देशी ब्रँड लावाचा हा 5G स्मार्टफोन एक चांगला पर्याय असू शकतो. 4 जीबी रॅम असलेल्या हँडसेटची Amazon वर किंमत 10,999 रुपये आहे. यात 6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 50MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप यासह अनेक फिचर मिळतील. Redmi 12 5G- Xiaomi चा हा 5G स्मार्टफोन 1 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आला आहे. 4 ऑगस्टपासून तुम्ही ते खरेदी करू शकता. तुम्ही 4GB + 128GB व्हेरिएंट हँडसेट Rs 10,999 मध्ये खरेदी करू शकता. यात 6.79 इंच डिस्प्ले, 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी यासह अनेक चांगली फिचर आहेत. Tecno Spark 10 5G: तुम्ही टेक्नो ब्रँडचा हा 5G हँडसेट खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन (मेटा व्हाईट, 64 जीबी)(4 जीबी रॅम व्हेरिएंट) 12,423 रुपयांच्या बजेटपेक्षा किंचित जास्त किंमतीत खरेदी करू शकता. 6.6 इंच डिस्प्ले, 50MP रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 50000 mAh बॅटरी यासह अनेक चांगली फिचर उपलब्ध आहेत.टॅग्स :मोबाइल५जीMobile5G