फोन स्लो झालाय का? ‘हे’ आहेत 8GB RAM असलेले 10 बेस्ट स्मार्टफोन By सिद्धेश जाधव | Published: April 13, 2022 06:49 PM 2022-04-13T18:49:43+5:30 2022-04-13T19:01:57+5:30
स्मार्टफोन स्लो होण्यामागे फोनचा रॅम हे एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन नक्कीच शोधत असाल. इथे तुमच्यासाठी अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो जे 8GB रॅमसह येतात. हे फोन्स अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. iQOO 7 iQOO 7 5G स्मार्टफोन 6.62-इंच 120Hz अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मागे 48MP चा मुख्य कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 870 चिपसेट आणि 8GB RAM देण्यात आला आहे. फोनमधील 4,400mAh ची बॅटरी 66W फ्लॅश चार्जसह देण्यात आली आहे.
Realme GT Master Edition Realme GT Master Edition मध्ये 6.43 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 778G 5G चिपसेट, 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळतो. हा फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme GT Master Edition मध्ये 4300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. चार्ज काला सपोर्ट दिला आहे.
Mi 11X Mi 11X फोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड 120Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. हा फोन Qualcomm Snapdragon 870 चिपसेट, 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह मिळतो. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8MP ची सेकंडरी सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी कॅमेरा 20 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 4,520mAh बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.
iQOO Z5 iQOO Z5 5G मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC, एड्रेनो 670 GPU, 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळते, ही बॅटरी 44W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करेल.
OPPO Reno 7 OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह मिळतो. हा मोबाईल मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह मिळतो. Reno 7 स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. यातील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
OnePlus Nord CE 2 फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या वनप्लसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यातील 4,500एमएएचची बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह मिळतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट सोबत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.
Xiaomi 11 Lite Xiaomi 11 Lite मध्ये 6.55-इंचाचा अॅमोलेड 90Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर आणि 8GB रॅमसह आला आहे. यात 4,250mAh ची बॅटरी 33 वॉट्स चार्जिंग स्पीडसह आली आहे. फोन 64MP रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.
Samsung Galaxy M52 5G सॅमसंग गॅलेक्सी M52 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 8GB रॅमसह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी मागे 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. फोनमध्ये 32 पिगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिवाइसमध्ये 25W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh च्या बॅटरी मिळते.
Vivo V21e 5G स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळत आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Deimensity 700 चिपसेट, माली जी57 जीपीयू आणि 8GB रॅम मिळतो. ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यातील 4,000एमएएचची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगसह मिळते.
iQOO Z3 5G iQOO Z3 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसरसह हा फोन 8GB रॅमला सपोर्ट करतो. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सरसह येतो. या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आहे, जी 55W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.