तब्येतीची काळजी घ्या स्वस्तात; भारतातील हे बेस्ट फिटनेस बँड ठेवतील तुमच्या आरोग्यावर लक्ष By सिद्धेश जाधव | Published: April 27, 2022 07:06 PM 2022-04-27T19:06:52+5:30 2022-04-27T19:16:26+5:30
फिटनेस बँड अगदी स्वस्तात तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. हे बँड्स तुमच्या स्टेप्स, कॅलरीज, झोपेचं पॅटर्न, हार्ट रेट, ऑक्सिजन लेव्हल इत्यादी गोष्टी ट्रॅक करतात. बाजारात जरी अनेक फिटनेस बँड्स असले तरी आम्ही तुमच्यासाठी 2022 मधील बेस्ट फिटनेस बँड्सची यादी घेऊन आलो आहोत. Xiaomi Mi Smart Band 6 हा सर्वाधिक विकला जाणारा एक लोकप्रिय फिटनेस बँड आहे. सिंगल चार्जवर 14 दिवस वापरता येतो. यात 450 नीट्स ब्राईटनेससह 1.56-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले, PPG हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सरसह अनेक ट्रॅकर्स मिळतात. याची किंमत 3,500 रुपये आहे.
Realme Band 2 Realme Band 2 मध्ये 1.4-इंचाचा डिस्प्ले मिळतो. यात 90 स्पोर्ट्स मोड्ससह SpO2 ट्रॅकिंग, स्लिप ट्रॅकिंग आणि स्ट्रेस ट्रॅकिंग फिचर मिळतं. यात 5ATM रेटिंग वॉटर रेजिस्टन्ससाठी देण्यात आली आहे. तुम्ही याचा वापर सिंगल चार्जवर 12-दिवस करू शकता.
Huawei Band 6 Huawei Band 6 मध्ये रुंद अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात हार्ट रेट सेन्सर, SpO2 ट्रॅकिंग, स्लिप ट्रॅकिंगसह 96 वर्कआऊट मोड मिळतात. 5ATM रेटिंग तुम्हाला 50-मीटर खोल पाण्यात देखील बँड वापरू देते. हा बँड सिंगल चार्जवर 14 दिवस वापरता येतो.
Redmi Smart Band Pro हा शाओमीचा सब-ब्रँड आहे. Redmi Smart Band Pro मध्ये 1.47-इंचाचा अल्वेज ऑन फिचर असलेला रुंद अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. हार्ट रेट सेन्सर, SpO2 मॉनिटर आणि 110 वर्कआऊट मोड्स देखील देण्यात आले आहेत. हा बँड महिलांच्या मेनूस्ट्रल सायकलसह स्ट्रेस आणि स्लिप देखील ट्रॅक करू शकतो. 5ATM वॉटर रेजिस्टन्ससह यात 20 दिवसांपर्यंतचा बॅटरी बॅकअप मिळतो.
OnePlus Band वनप्लस या आणि शाओमीच्या बँडमध्ये जास्त फरक नाही. यात 1.1-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात देखील हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 सेन्सर मिळतो. 13 एक्सारसाईज मोड देखील देण्यात आले आहेत. कंपनीनं या बँडमध्ये 5ATM IP68 वॉटर रेजिस्टन्स रेटिंग दिली आहे.
Fitbit Charge 5 या यादीतील हा सर्वात महागडा आणि लोकप्रिय फिटनेस बँड आहे. या एक OLED डिस्प्ले मिळतो. हार्ट रेट ट्रॅकिंगसाठी यात ECG सेन्सर देण्यात आला आहे. तर SpO2 सेन्सर रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल सांगतो. स्लिप, स्ट्रेस आणि मेनूस्ट्रल सायकल ट्रॅक करण्याचे पर्याय देखील आहेत. यात फक्त 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.