best internet browser software
'हे' आहेत बेस्ट इंटरनेट ब्राऊजर By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:21 PM2019-03-12T16:21:00+5:302019-03-12T16:34:18+5:30Join usJoin usNext www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असतात. त्यांना एकत्र जोडून वेबसाइट तयार केली जाते. वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना या शोधाचे श्रेय जाते. गुगलने खास डुडल तयार करताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाला ही सलाम केला आहे. बेस्ट इंटरनेट ब्राऊजरबाबत जाणून घेऊया. Google Chrome Google Chrome Browser ला Chrome या नावाने ओळखले जाते. क्रोम इंटरनेट Users ची पहिली पसंती आहे. Google ने 2008 मध्ये Chrome Browser लाँच केलं. Chrome Browser एक Fast आणि Simple Browser आहे. Chrome Browser जवळपास 50 पेक्षा भाषांमध्ये उपलब्ध आहे. Mozilla Firefox Mozilla Firefox Browser हे Desktop Users साठी अत्यंत लोकप्रिय ब्राऊजर आहे. Mozilla Firefox Browser Firefox नावाने प्रसिद्ध आहे. Mozilla Foundation आणि Mozilla Corporation ने मिळून हे ब्राऊजर तयार केले आहे. Firefox एक Open Source Web Browser असून User Friendly आहे. तसेच Firefox हे Windows, Linux, Android OS साठी विकसित करण्यात आले होते. Internet Explorer Internet Explorer Browser Windows OS चा वापर करणाऱ्या युजर्सचं Default Browser असतं. तसेच हे Browser Secure & Fast Browser मानलं जातं. Internet Explorer हे Microsoft Corporation द्वारे तयार करण्यात आले आहे. 1995 मध्ये Windows Users साठी हे लाँच करण्यात आले होते. Safari Browser iPhone तयार करणारी कंपनी Apple ने Safari Browser तयार केले आहे. Safari Browser Mac OS आणि Windows OS साठी उपलब्ध आहे. Mac Users मध्ये Safari Browser हे अत्यंत लोकप्रिय ब्राऊजर आहे. Opera Browser Opera Browser हे जुनं ब्राऊजर आहे. Opera Software द्वारे हे ब्राऊजर तयार करण्यात आले आहे. 1995 मध्ये ओपेरा लाँच करण्यात आले होते. ओपेरा ब्राऊजर जवळपास 40 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. ओपेरा ब्राऊजर हे Windows, Linux, Mac OS साठी Develop करण्यात आले आहे. Opera Mobile User साठी उपलब्ध आहे. Mobile Users मध्ये Opera Mini Browser अत्यंत लोकप्रिय आहे. टॅग्स :इंटरनेटगुगलInternetgoogle