Best Phones Under 10000: सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच By सिद्धेश जाधव | Published: January 18, 2022 05:23 PM 2022-01-18T17:23:33+5:30 2022-01-18T17:39:24+5:30
Best Phones Under 10000: सध्या देशातील दोन्ही प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर सेल सुरु आहेत. फ्लिपकार्टचा सेल 22 तर अॅमेझॉनचा सेल 20 जानेवारी चालणार आहे. या सेलमध्ये काही स्मार्टफोन्स 10 हजार रुपयांच्या आत मिळत आहेत. यातील काही दमदार स्मार्टफोन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Tecno Pop 5 LTE अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन 6,299 रुपयांमध्ये मिळत आहे. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 6.52 इंचाचा डिस्प्ले मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi 9A Sport Redmi 9A Sport मध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर, 13 MP रियर कॅमेरा, 5 MP चा फ्रंट कॅमेरा, 6.53 इंच का HD+ डिस्प्ले, आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स मिळतात. ऍमेझॉनवर याची किंमत 6,999 रुपयांपासून सुरु होत आहे.
Realme Narzo 50i रियलमी नार्जो 50i स्मार्टफोन अॅमेझॉनवरून 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. तसेच यात 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले, 8MP चा प्रायमरी कॅमेरा, 5MP चा फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Tecno Spark 8T टेक्नो स्पार्क 8टी स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला मॉडेल अॅमेझॉनवर 9,299 रुपयांमध्ये मिळत आहे. यात 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले, 50MP चा रियर कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि Helio G35 गेमिंग प्रोसेसर मिळतो.
Samsung Galaxy M12 Samsung Galaxy M12 ची विक्री अॅमेझॉनवर सुरु आहे. या फोनची किंमत 9499 रुपये आहे. फोनमध्ये 90Hz डिस्प्ले आणि 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 48MP चा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो.
realme C11 2021 फ्लिपकार्टवर रियलमी सी11 2021 स्मार्टफोन 7,499 रुपयांमध्ये मिळत आहे. यात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. यात 6.5 इंच HD+ डिस्प्ले, 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5MP चा फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi 9i रेडमी 9आय चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल 8,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. 6.53 इंचाचा HD+ डिस्प्ले, 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5MP चा फ्रंट कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर मिळतो.
POCO C31 हा पोकोचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे जो फ्लिपकार्टवर 8,999 रुपयांमध्ये मिळत आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. सोबत 6.53 इंचाचा HD+ डिस्प्ले, 13MP + 2MP + 2MP चा रियर कॅमेरा, 5MP चा फ्रंट कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio G35 प्रोसेसर मिळतो.
Oppo A12 फ्लिपकार्टवर ओप्पो ए12 स्मार्टफोन 9,240 रुपयांमध्ये मिळत आहे. ही 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा एक 6.22 इंचाचा एचडी+ डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. ज्यात 13MP चा ड्युअल रियर कॅमेरा, आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. 4230mAh ची बॅटरी असलेला हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरवर चालतो.
SAMSUNG Galaxy F12 सॅमसंग गॅलेक्सी एफ12 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत फ्लिपकार्टवर 9,699 रुपये आहे. हा एक 6.51 इंचाचा HD+ डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. ज्यात 48MP चा क्वॉड रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी 6000mAh च्या बॅटरीसह येणारा हा फोन Exynos 850 प्रोसेसरवर चालतो.