रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टवॉच; आधीच देतील आजारांची सूचना
By सिद्धेश जाधव | Updated: December 14, 2021 19:04 IST2021-12-14T18:50:47+5:302021-12-14T19:04:55+5:30
Best Smartwatch with SpO2 Sensor: स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडमध्ये SpO2 सेन्सर दिला जातो. सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर हा सेन्सर रक्तातील प्राणवायूच प्रमाण किती आहे हे सांगतो. हे प्रमाण गरजेपेक्षा कमी झाल्यास स्मार्टवॉच एक अलर्ट पाठवतात. आज आपण भारतातील SpO2 सेन्सर असलेल्या बेस्ट स्मार्टवॉचची माहिती घेणार आहोत.

Mi Smart Band 6
Xiaomi च्या फिटनेस बँड Mi Smart Band 6 ची किंमत फक्त 3,499 रुपये आहे. हा स्मार्टवॉच SpO2 ट्रॅकिंग, स्ट्रेस आणि स्लीप मॉनीटरिंग सारख्या हेल्थ फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये हा वॉच दहा दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे.
GOQii Smart Vital Fitness
हा एक व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टवॉच आहे, जो GOQii या भारतीय ब्रँडनं बाजारात सादर केला आहे. कमी किंमतीत देखील यात SpO2, हार्ट रेट, बॉडी टेंप्रेचर आणि ब्लड प्रेशर ट्रॅकरमिळतो. IP68 रेटिंगसह येणार हा वॉच 3,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Amazfit Bip U Pro
Amazfit Bip U Pro ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यात 24×7 हार्ट रेट मॉनीटरिंग, SpO2 मॉनीटर, स्लीप क्वालिटी अॅनालाइजर असे अनेक फिचर मिळतात.
Noise ColorFit Ultra
Noise ColorFit Ultra मध्ये 60 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच यात कॉल्स आणि एसएमएस क्विक रिप्लाय असे फिचर मिळतात. 4,499 रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टवॉच SpO2 सेन्सर, हार्ट रेट आणि स्ट्रेस मॉनीटर करतो.
realme Smart Watch S
रियलमीनं देखील वियरबेल सेगमेंटमध्ये चांगलं नाव कमावलं आहे. कंपनीचा हा स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 15 दिवस वापरता येतो, असा दावा करण्यात आला आहे. SpO2 सेन्सर आणि हार्ट रेट सेन्सरसह येणार हा स्मार्ट वॉच 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
OnePlus Smart Band
हा या लिस्टमधील SpO2 सेन्सर असलेला सर्वात स्वस्त डिवाइस आहे. वनप्लसनं यात 5ATM+ वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स असल्याचा दावा केला आहे. हार्ट रेट आणि स्लिप ट्रॅकिंग फिचरसह येणाऱ्या या बँडची किंमत फक्त 2,497 रुपये आहे.
OPPO Smart Band
ओप्पोनं बजेटमध्ये आपला हा स्मार्ट बँड सादर केला आहे. यात 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तसेच SpO2 सेन्सरसह येणार हा बँड फक्त 2,799 रुपयांमध्ये अॅमेझॉनवरून विकत घेता येईल.
Amazfit GTR 3 Pro
Amazfit एक लोकप्रिय वियरेबल ब्रँड आहे. कंपनीनं हा स्मार्टवॉच अलेक्सा सपोर्टसह सादर केला आहे. 12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येणारा हा वॉच रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मॉनिटर करतो. याची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Samsung Galaxy Watch 4
Samsung Galaxy Watch 4 स्मार्टवॉच हा एक महागडा पर्याय आहे. यात SpO2 सेन्सर, BP मॉनीटर, ECG सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच हा स्मार्टवॉच Google च्या WearOS सह बाजारात आला आहे. या सॅमसंग वॉचची किंमत 26,999 रुपये आहे.
Apple Watch Series 7
Apple Watch Series 7 या यादीतील सर्वात लोकप्रिय स्मार्टवॉच आहे. यात SpO2 सेन्सरसह ECG आणि की वर्कआउट मोड देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यात IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स रेटिंग मिळते. याची किंमत 41,900 रुपयांपासून सुरु होते.