Beware! Do not dial 401* number by mistake; Otherwise, your WhatsApp is hacked!
सावधान! चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका; अन्यथा तुमचे WhatsApp हॅक झालेच समजा! By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:03 PM2022-12-05T15:03:26+5:302022-12-05T15:10:28+5:30Join usJoin usNext Whatsapp हॅक करणे थोडेसे अवघड आहे, पण हॅकिंग अशक्य नाही. व्हॉट्सअॅप Whatsapp जगभरात खूप लोकप्रिय झाले आहे. काळासोबत व्हॉट्सअॅपच्या चॅटिंगच्या पद्धतीतही बदल होताना दिसत आहेत. पण असे असताना व्हॉट्सअॅप हॅक करणे थोडेसे अवघड आहे, पण हॅकिंग अशक्य नाही. अशा काही पद्धती आहेत ज्या अगदी बेसिक आहेत आणि कोणीही चुकीच्या हेतूने आपल्या विरुद्ध वापरू शकेल. Whatsapp हॅक करण्याची नवनवीन पद्धत हॅकर्स शोधून काढत आहे. Whatsapp हॅक करण्याची अशीच नवीन पद्धत आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात फसणार नाही. व्हॉट्सअॅप युजर्सना अनोळखी नंबरवरून एक कॉल येतो. यावर हॅकर्स स्वत: एक ब्रॉडबँड, केबल मेकॅनिक किंवा अभियंता असल्याचं युजर्सना सांगतो. तसेच अनेक वेळा हॅकर्स स्वतः टेलिकॉम ऑपरेटरच्या प्रतिनिधी असल्याचेही सांगतो. हॅकर्स व्हाट्सअॅप युजर्सला सांगतो की, तुमचे कनेक्शन डिस्कनेक्ट झाले आहे आणि ते टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर 401* हा नंबर डायल करा, असं सांगतो. 401* हा नंबर तुम्ही डायल केल्यानंतर हॅकर्स तुमचे व्हाट्सअॅप हॅक करतो. 401* हा कॉल डायव्हर्टचा कोड आहे. त्यामुळे हॅकर्स त्यांच्या मोबाईल नंबरवर डायल करण्यास सांगतात. ते डायल केल्यावर, वापरकर्त्याचा कॉल स्कॅमरच्या मोबाईलवर ट्रान्सफर होतो. त्यानंतर कॉलवर व्हॉट्सअॅपवरून नवीन ओटीपीची मागणी करून हॅकर्स तुमचे व्हॉट्सअॅप खाते त्यांच्या फोनमध्ये लॉग इन करतात. स्कॅमर्स खात्यासह द्वि-घटक प्रमाणीकरण देखील सेट करतात. यामुळे, पीडित व्यक्तीला खात्यात लवकर प्रवेश मिळत नाही. तथापि, वापरकर्ते कंपनीला मेल करून याबद्दल तक्रार करू शकतात आणि खाते प्रवेशाची मागणी करू शकतात. परंतु, यादरम्यान हॅकर्स व्हॉट्सअॅप मित्रांकडून पैशांची मागणी करून लाखोंची फसवणूक करत असल्याचे प्रकरण समोर येत आहेत. टॅग्स :व्हॉट्सअॅपसायबर क्राइमWhatsAppcyber crime