भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा? By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:27 PM 2020-03-09T13:27:25+5:30 2020-03-09T13:36:43+5:30
टेलिकॉम क्षेत्रामध्ये जिओने स्पर्धा निर्माण केल्याने एअरटेल, व्होडाफोनसारख्या भल्याभल्या कंपन्यांची पळता भूई थोडी झाली आहे. असे असताना ब्रॉडबँड क्षेत्रातील एका कंपनीने जिओला टक्कर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने देशात ५ जी लाँच करण्याची तयारी केली आहे. जिओने काही महिन्यांपूर्वी जिओ फायबर लाँच करत धमाका उडवून दिला होता.
कनेक्शनसोबत टीव्ही, लँडलाईन आदी ऑफरही दिल्या होत्या. मात्र, जिओला टक्कर देणारा गडी तयार झाला आहे. या कंपनीने ग्राहकांना थेट 300 एमबीपीएसची ऑफरच देऊ केली आहे.
टेलिकॉम क्षेत्रामध्ये जिओने स्पर्धा निर्माण केल्याने एअरटेल, व्होडाफोनसारख्या भल्याभल्या कंपन्यांची पळता भूई थोडी झाली आहे. असे असताना ब्रॉडबँड क्षेत्रातील एका कंपनीने जिओला टक्कर देण्यासाठी पाऊल उचलले आहे.
ACT फायबरनेटने ही 300 एमबीपीएसची ऑफर देऊ केली असून डेटाही अनलिमिटेड मिळणार आहे. मात्र, ही ऑफर 31 मार्च 2020 पर्यंतच उपलब्ध असून या काळात ही ऑफर घेणाऱ्यांकडून कोणताही जादा चार्ज आकारला जाणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ही ऑफर नवीन ग्राहकांना नसून जुन्या ग्राहकांना इमेल करून याची माहिती देण्यात येत आहे. कंपनीने ही ऑफर ट्विटरवरही पोस्ट केली आहे. ग्राहक त्यांचा सध्याचा प्लॅन अपग्रेड करू शकतता. यासाठी प्लेस्टोअरवरून अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.
ही ऑफर देशभरात लागू असून लॉग इन केल्यानंतर स्पीड वाढविता येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे एन्ट्री लेव्हलच्या प्लॅनलाही 100 एमबीपीएसचा वेग देण्यात येत आहे.
ACT फायबरनेटने नुकतेच नेटफ्लिक्ससोबत सहकार्य करार केला आहे. यानंतर कंपनी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनवर जादा डेटा आणि दणक्यात डिस्काऊंट देत आहे.
ACT Blaze प्लानमध्ये 100Mbps चा वेग आणि 450 जीबीचा डेटा देण्यात येत आहे. हा एन्ट्रीलेव्हल प्लॅन असून ६ महिने किंवा १ वर्ष प्लॅन घेतल्यास 1500 जीबीचा वाढीव डेटा देण्यात येत आहे.
अॅक्टचे केवळ एमबीपीएसमध्येच प्लॅन नसून ACT गीगा ब्रॉडबँड प्लानमध्ये 1 जीबीपीएसचा वेग देण्यात आला आहे. हा प्लॅन सध्यातरी हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नईमध्येच लाँच केला आहे.
अॅक्टचे केवळ एमबीपीएसमध्येच प्लॅन नसून ACT गीगा ब्रॉडबँड प्लानमध्ये 1 जीबीपीएसचा वेग देण्यात आला आहे. हा प्लॅन सध्यातरी हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नईमध्येच लाँच केला आहे.