स्मार्टफोनबद्दलच्या 'या' गोष्टी आहेत पूर्णपणे खोट्या; जाणून घ्या अन् स्मार्ट व्हा By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 03:49 PM 2018-11-26T15:49:56+5:30 2018-11-26T17:02:17+5:30
स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र स्मार्टफोनबाबत अनेक अफवा आहेत. स्मार्टफोनचा वापर जास्त केल्यावर फोनची बॅटरी लवकर संपते आणि मग ऐनवेळी बॅटरी कमी होते. तेव्हा फोन चार्ज करण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होते. याच घाईत झटपट फोन चार्ज करताना आपण काही चुका हमखास करतो. स्मार्टफोनबद्दलच्या काही गोष्टी पूर्णपणे खोट्या आहेत त्याबाबत जाणून घेऊया.
स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करताना ती फूल चार्ज करा अशी एक अफवा आहे. मात्र जास्तवेळ बॅटरी चार्ज केल्यानंतर तीची ‘बॅटरी लाईफ’ कमी होते. स्मार्टफोन 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करावा. प्रत्येकवेळी 100 टक्के चार्ज केलाच पाहिजे असे नाही.
स्मार्टफोनमध्ये ब्राईटनेसचा एक पर्याय देण्यात आलेला असतो. फोनचा ब्राईटनेस जास्त असल्यास स्मार्टफोनची बॅटरी लवकर लो होते असं म्हटलं जातं. मात्र आता अनेक स्मार्टफोनमध्ये ऑटो ब्राईटनेसचा पर्याय असल्याने ब्राईटनेस आपोआपच कमी होतो.
स्मार्टफोनमधील कॅमेरा जितका जास्त मेगापिक्सलचा तितका चांगला फोटो येतो असे म्हटले जाते. मात्र फक्त जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा असून चालत नाही तर त्यासोबत अपर्चर आणि इतरही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात.
रात्रभर स्मार्टफोन कधीही चार्ज करायला ठेवू नका असं प्रामुख्याने सांगितलं जातं. असं केल्यास बॅटरी लवकर खराब होते असं म्हणतात. मात्र फोन पूर्ण चार्ज असेल तर चार्जर करंट घेत नाही.
थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड केल्यानंतर फोनमध्ये व्हायरस येतात अशी एक अफवा आहे. मात्र हे पूर्णत: सत्य नाही कारण अनेक अॅपमध्ये व्हायरस नसतो.
फोन चार्ज करताना दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने फोन चार्ज करू नका कारण त्यामुळे चार्जिंग जॅक खराब होतो असे म्हटले जाते. मात्र त्या चार्जरची क्षमता आणि तुमच्या चार्जरची क्षमता सारखी असल्यास कोणतेही नुकसान होत नाही.
कधी कधी फोनवर बोलत असताना फोन अचानक कट होतो. त्यावेळी आपण सर्वप्रथम मोबाईल नेटवर्क चेक करतो. मात्र फोनवर सर्व सिग्नल दाखवले जात असले तरी आवाज येत नाही कारण सिग्नलची क्वालिटी ही डेसिबलवर अवलंबून असते.