Bill Gates will pay 35 million; This job has to be done on feature phone
बिल गेट्स देणार 35 लाख; फक्त फोनमध्ये करावे लागणार हे काम By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:24 PM2020-01-03T14:24:33+5:302020-01-03T14:30:16+5:30Join usJoin usNext मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स तुम्हाला ओळखीचे असतीलच. जगातील सर्वात दानशूर माणूस. हेच बिल गेटस् तुम्हाला 35 लाख रुपये देण्यासाठी तयार आहेत. पण एवढे पैसे तुम्हाला फुकट नाही मिळणार. यासाठी तुम्हाला गेट्स यांनी एक काम सांगितले आहे. स्मार्टफोनसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. मात्र, आजही देशातील करोडो लोक फिचर फोन वापरत आहेत. एका अहवालानुसार भारतात 50 कोटी लोक फिचर फोन वापरतात. स्मार्टफोन युजर वेगाने त्यांच्या फोनद्वारे डिजिटल पेमेंट करतात. मात्र, फिचर फोनसाठी ही सुविधा नाहीय. बिल गेट्सनी हेच हेरले आहे. तुम्हाला फिचर फोनसाठी एक पेमेंट सिस्टिम तयार करायची आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार फिचर फोनद्वारे *99# डायल करून खूप कमी म्हणजे पाच लाख व्यवहार होत आहेत. कारण फिचर फोनद्वारे डिजिटल पेमेंट करणे सोपे नाहीय. यामुळे अनपीसीआयने CIIE.CO, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसोबत भागीदारी केली आहे. त्यांनी एका स्पर्धा आयोजित केली आहे. याचे नाव ‘Grand Challenge Payments Using Feature Phones’ असे आहे. ही स्पर्धा फिचर फोनवर डिजिटल पेमेंट सिस्टिम सुरू करण्यासाठी आहे. ही सिस्टिम बनविणाऱ्याला 35 लाख रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग नोंदविण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2020 आहे. विजेत्याची घोषणा 14 मार्च 2020 ला करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्य़ा स्पर्धकाला NPCI APIs चा अॅक्सेस 11 फेब्रुवारीला मिळणार आहे. याशिवाय एनपीसीआयचे अधिकारीही मदत करणार आहेत.टॅग्स :बिल गेटसबँकिंग क्षेत्रमोबाइलBill GatesBanking SectorMobile