८ डॉलर्सला ब्लू टिक घेतली, कंपनीचं १२२३ कोटींचं केलं नुकसान; मस्क यांची 'टिवटिव' पडली भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 04:14 PM2022-11-12T16:14:55+5:302022-11-12T16:21:46+5:30

गेल्या काही दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटर(Twitter) ताब्यात घेतलं. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. पहिलाच निर्णय धडाडीचा घेत सीईओ पराग अग्रवाल यांना घरचा रस्ता दाखवला.

गेल्या काही दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटर(Twitter) ताब्यात घेतलं. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. पहिलाच निर्णय धडाडीचा घेत सीईओ पराग अग्रवाल यांना घरचा रस्ता दाखवला. तर दुसरीकडे ट्विटरवर ब्लू टिक वापरणाऱ्यांना ८ डॉलर रुपये प्रति महिन्या लागू केले. त्यामुळे ट्विटर वापरणाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करत इलॉन मस्कवर (Elon Musk) टीका केली.

इलॉन मस्क यांनी ट्विटर वर ब्लू टिक वापरणाऱ्यांसाठी आता ८ डॉलर प्रति महिने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक यूजर्स फेक अकाउंट बनवून ब्लू टिक्स खरेदी करत आहेत. यामुळे, ट्विटरवरील बनावट खाती व्हेरिफाय स्वरूपात आले आहेत आणि त्यावरुन बनावट बातम्या आहेत.

एका फार्मसी कंपनीला याचा मोठा फटका बसला आहे.एली लिली (LLY) ही एक मोठी फार्मसी कंपनी आहे, या कंपनीच्या नावाने एक बनावट खाते बनवण्यात आले. आणि त्या खात्याला ब्लू टिक घेतली. त्यामुळे कंपपनीला अब्जावधी रुपयांचा फटका बसला.

या फेक अकाउंटवरून 'इन्सुलिन इज फ्री आहे' असे ट्विट केले. हे ट्विट गुरुवारी करण्यात आले. एली लिली ही एक अमेरिकन फार्मसी कंपनी आहे जी इन्सुलिन तयार करते.

या ट्विटनंतर कंपनीचा शेअर ४.३७ टक्क्यांनी घसरला आणि कंपनीचे मार्केट कॅप सुमारे १५ बिलियन डॉलर (सुमारे १२२३ अब्ज रुपये) कमी झाले आहेत. दरम्यान, ही माहिती उघड होताच कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवरुन या माहितीचे कंपनीने खंडन केले.

ट्विटरने पुन्हा एकदा ब्लू टिक व्हेरिफिकेशनचा निर्णय पाठिमागे घेतला आहे. फेक अकाऊंटच्या घटना समोर येताच ट्विटरने ब्लू टिक व्हेरिफेकनसाठी घेतलेला निर्णय पाठिमागे घेतला.

इलॉन मस्क यांनी नुकतेच एका ट्विटमध्ये माहिती दिली होती की, एखाद्या कंपनीच्या किंवा व्यक्तीच्या खात्याला त्यांचे नाव आणि बायो या दोन्ही ठिकाणी parody लिहावे लागेल, जेणेकरून लोकांचा गोंधळ होणार नाही.