Jio आणि Airtel ला BSNL देणार टक्कर; 5G वर पहिला कॉल, लाँचिंगची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 03:54 PM2024-08-03T15:54:52+5:302024-08-03T17:38:16+5:30

BSNL कंपनी आपल्या 5G सर्व्हिसची टेस्ट करत आहे.

गेल्या काही दिवसांत Jio, Airtel आणि Vi या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, सरकारी कंपनी BSNL अजूनही जुन्याच दरात आपली सर्व्हिस देत आहे.आता BSNL कंपनी आपल्या 5G सर्व्हिसची टेस्ट करत आहे.

कंपनी अद्याप आपली 4G सर्व्हिस पूर्णपणे आणू शकली नाही, परंतु आता 5G साठी तयारी केली जात आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरकारी टेलिकॉम ऑपरेटर BSNLच्या सर्व्हिसची क्लिप शेअर केली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी BSNL 5G द्वारे व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला. अलीकडे, BSNLच्या ग्राहक संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओ कॉलची क्लिप शेअर करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लिहिले, "कनेक्टिंग इंडिया! BSNL 5G इनेबल फोन कॉल करून पाहिला."

ही एक अतिशय छोटी क्लिप आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सी-डॉट कॅम्पमध्ये BSNL 5G कॉलचा अनुभव घेतला आहे. कॉल करत असताना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, हा कॉल BSNL 5G वर करण्यात आला होता.

ताज्या रिपोट्सनुसार, BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 27.5 ग्राहक जोडले आहेत. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या सर्व्हिस म्हणजे प्लॅनच्या किंमती महाग झाल्यानंतर BSNL ग्राहकांच्या दरात ही वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सरकार BSNL आणि MTNL 4G आणि 5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी वेगाने काम करत आहे. BSNL च्या कामावर दररोज लक्ष ठेवले जात आहे. BSNL सर्व्हिस सुरू होण्यास विलंब होत असला तरी लोकांना या सेवेचा अभिमान वाटेल आणि त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल, असे मंत्री म्हणाले.

2023-24 मध्ये राष्ट्रीय लघु बचत निधीच्या कक्षेत या योजनांच्या संकलनात 20,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. केवळ ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यात १.१२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दरम्यान, सरकारने 2024-25 साठी राष्ट्रीय लघु बचत निधीचे संकलन लक्ष्य 4.67 लाख कोटी रुपयांवरून 4.2 लाख कोटी रुपये केले आहे.