BSNL Recharge Plan BSNL to give a chance to win 1 lakh rupees on 'this' recharge; See details
BSNL ची ग्राहकांना भेट, 'या' रिचार्जवर मिळेल 1 लाख रुपये जिंकण्याची संधी; पाहा डिटेल्स... By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 08:15 PM2024-07-19T20:15:30+5:302024-07-19T20:20:44+5:30Join usJoin usNext ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने नवीन ऑफर आणली आहे. BSNL Recharge Plan : खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea(vi) ने त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. याचा फायदा घेत सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ग्राहकांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी BSNL अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत आहे. त्यामुळे ग्राहकदेखील आता खाजगी कंपन्यांकडून BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, आता BSNL ने आपल्या ग्राहकांना कनेक्टेड ठेवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये BSNL च्या ग्राहकांना 1 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला फक्त BSNL चे रिचार्ज करावे लागणार आहे. BSNL प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी निवडक स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) वर 1 लाख रुपयांचे बक्षीस देत आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये BSNL ने म्हटले की, ते ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देतील. यासाठी ग्राहकांना झिंग ॲप डाउनलोड करावे लागेल. BSNL निवडक STV मधून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 1 लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. हे STV रु. 118, रु 153, रु. 199, रु 347, रु 599, रु 997, रु 1999 आणि रु 2399 चे आहेत. वरील रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर झिंग ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, Lucky ग्राहकाला BSNL कडून बक्षिसे मिळेल. BSNL ची ही योजना नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि निष्क्रिय ग्राहकांना रिचार्जसाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे. तुम्ही अद्याप बीएसएनएलचे ग्राहक नसाल, तर तुम्ही नवीन सिम मोफत खरेदी करू शकता. कंपनीने मोफत 4G सिम कार्ड देण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, तुम्ही तुमच्या जुन्या नंबरमधून BSNL मध्ये पोर्ही करू शकता. यासाठी जवळच्या BSNL सेंटरला भेट द्या.टॅग्स :बीएसएनएलतंत्रज्ञानएअरटेलजिओव्होडाफोन आयडिया (व्ही)BSNLtechnologyAirtelJioVodafone Idea