‘हे’ आहेत भारतातातील 10 सर्वात स्वस्त 5G Smartphones, परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स
By सिद्धेश जाधव | Updated: March 23, 2022 19:24 IST2022-03-23T19:12:56+5:302022-03-23T19:24:43+5:30
Cheapest 5G Phones India March 2022: भारतीय बाजारातील 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच 5G स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. जर तुम्ही स्वस्त 5G मोबाईल शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक यादी घेऊन आलो आहोत. ज्यात देशातील सर्वात स्वस्त 5G Phones चा समावेश आहे.

या यादीत Redmi, Realme, POCO, Samsung, आणि अन्य कंपन्यांचे स्मार्टफोन्स आहेत. ज्यांची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते.
iQOO Z6
iQOO Z6 नुकताच लाँच झाला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC मिळते, जी बिल्ट-इन 5G मॉडेमसह येते. सोबत 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा फोन 14,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत विकत घेता येईल.
Realme 9 5G
Realme 9 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 810 चिपसेटसह बाजारात आला आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आणि 18W फास्ट चार्जिंगसह मोठी मिळते. फोनमध्ये 48MP + 2MP आणि 2MP सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप मिळतो. ड्युअल सिम 5G सपोर्टसह येणारा Realme 9 5G तुम्ही 14,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
Vivo T1 5G
Vivo T1 मध्ये Snapdragon 695 SoC, 120Hz रिफ्रेश रेट, 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा, आणि 5,000mAh बॅटरी मिळते. या फोनची किंमत Rs 15,990 रुपयांपासून सुरु होते.
Realme 9 Pro
Realme 9 Pro मध्ये 64MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सोबत स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते.
POCO M4 Pro 5G
POCO M4 Pro 5G मध्ये देखील मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट मिळतो. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल मेमोरी देण्यात आली आहे. फोनच्या मागे 50MP + 8MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 6.6 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला एलसीडी डिस्प्ले मिळतो. 5000mAh ची बॅटरी असलेल्या या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे.
Moto G71 5G
Moto G71 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट, 16MP सेल्फी कॅमेरा, 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा, 5,000mAh ची बॅटरी आणि IP52 रेटिंग मिळते. Moto G71 5G स्मार्टफोन भारतात 18,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
Samsung Galaxy F23 5G
रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Samsung Galaxy F23 भारतात आला आहे. या Snapdragon 750G SoC 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा-सेटअप मिळतो. Samsung Galaxy F23 5G ची किंमत Rs 19,999 रुपयांपासून सुरु होते.
Realme 9 5G SE
Realme 9 5G SE मध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट, 90Hz रिफ्रेश रेट, मोठी मोठी बॅटरी 48MP + 2MP आणि 2MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. कंपनीनं Realme 9 5G SE ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु केली आहे.
Infinix Zero 5G
Infinix Zero 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट, 5,000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे.
Redmi Note 11 Pro+ 5G
Redmi Note 11 Pro+ 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट मिळतो. सोबत 8GB रॅम आणि 108MP रियर कॅमेरा असे दमदार स्पेक्स मिळतो. या डिवाइसची किंमत 20,990 रुपयांपासून सुरु होते.