Coronavirus : फेक न्यूजचं असं करा फॅक्ट चेक, जाणून घ्या व्हायरल गोष्टींमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:36 PM2020-04-10T19:36:23+5:302020-04-10T19:47:47+5:30

Coronavirus : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी अनेकदा फेक मेसेज हे खरे वाटतात. व्हायरल गोष्टींमागचं सत्य जाणून घ्या.

कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 5000 हून अधिक झाला असून 160 अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वेगाने पसरणाऱ्या या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान घरबसल्या लोक सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह झाले असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज, बातम्या, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही लोक कोरोनासंदर्भातील बातम्या, व्हिडिओ, फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत आहेत.

फेक मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं आवश्यक आहे. कारण फेक मेसेज पाठवणं महागात पडू शकतं.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी अनेकदा फेक मेसेज हे खरे वाटतात. व्हायरल गोष्टींमागचं सत्य जाणून घ्या.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडियावर आलेल्या फेक न्यूज ओळखणं आता सोपं झालं आहे. व्हायरल मेसेज, बातम्या, फोटो आणि व्हिडिओ फेक आहेत की खरे आहेत हे कसं ओळखायचं जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल बातमीची किंवा व्हिडिओची हेडलाईन तपासा. खोट्या बातम्यांच्या हेडलाईनमध्ये अनेकदा घोळ असतो. तसेच चुका असतात.

एखादा फोटो एडिट करणं आता सहज शक्य आहे. त्यामुळे व्हायरल गोष्टीतील फोटो आधी चेक करा. तो नीट लक्षपूर्वक पाहा. फेक न्यूजमध्ये प्रामुख्याने फोटोंचा चुकीचा वापर केलेला असतो.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर असंख्य गोष्टी या सातत्याने शेअर केल्या जात असतात. मात्र त्याचा सोर्स हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यावरून त्या बातमीची सत्यता तपासता येते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टी या बऱ्याचदा जुन्या असतात. फॅक्ट चेकमध्ये हे काही वेळा समोर येतं. त्यामुळे बातमी चेक करायची असेल तर तिची तारीख तपासा.

एखादी बातमी तुमच्याकडे आली तर सर्वप्रथम त्याची यूआरएल म्हणजेच लिंक चेक करा. लिंकवरून बातमी खरी आहे की खोटी हे ओळखता येतं. लिंकमध्ये अनेकदा स्पेलिंग चुकीच्या असतात.

व्हायरल झालेला मेसेज, बातमी, फोटो आणि व्हिडीओ खरा आहे की खोटा हे समजून घेण्यासाठी गुगलची मदत घ्या. गुगलवर त्यासंबंधी सर्च करून माहिती मिळवा.

कोरोनासंदर्भातील विविध गोष्टी या सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र एखादा मेसेज, बातमी, फोटो, व्हिडीओ हा फेक असू शकतो.

एखादा मेसेज इतरांना पाठवण्याआधी एकदा विचार करा. त्याची सत्यता तपासून घ्या. फेक न्यूजचं फॅक्ट चेक करा.