Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 02:50 PM2020-04-07T14:50:44+5:302020-04-07T15:08:00+5:30

Coronavirus : सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कॉल केले जात आहेत. मात्र अनेकदा नेटवर्कमुळे त्याची क्वॉलिटी खराब होते. व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स घ्यायचा असेल तर काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. घरात बसून राहावे लागत असल्याने अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे.

काही कंपन्यांनी लॉकडाऊनमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते. 

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याच प्रभावी माध्यम आहे. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. युजर्सना कंपनीने खास व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचे फीचर दिलं आहे

सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कॉल केले जात आहेत. मात्र अनेकदा नेटवर्कमुळे त्याची क्वॉलिटी खराब होते. व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स घ्यायचा असेल तर काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी चांगलं आणि हायस्पीड नेटवर्क गरजेचं असतं. सेल्युलर नेटवर्कवर कॉल केल्यास अनेक समस्या येतात.

वाय-फाय कनेक्शन ट्राय करा. व्हॉईस कॉलची क्वॉलिटी सुधारण्यासोबतच वाय-फाय व्हिडिओ कॉलिंगची मजा आणखी वाढवतं. 

कामासाठी अनेकदा कमी डेटा असताना व्हॉट्सअ‍ॅपचं काम करणं गरजेचं असतं. अशावेळी लो डेटा युजेस फीचरचं महत्त्व अधिक वाढतं.

व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये देण्यात आलेलं हे फीचर इनेबल म्हणजेच ऑन केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपच्या कॉलची क्वॉलिटी ही कमी डेटामध्ये बेस्ट होते.

फोनमध्ये बॅकग्राऊंडला चालणारे अ‍ॅप्सही बऱ्याच वेळेस कॉलच्या खराब क्वॉलिटीला कारणीभूत असतात. फोनचा परफॉर्मन्स कमी करण्यासोबत ते कॉलची क्वॉलिटीही खराब करतात. 

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस अथवा व्हिडिओ कॉलिंग करताना नेहमी बॅकग्राऊंडला सुरू असणारे विविध अ‍ॅप्स सर्वप्रथम बंद करा.

फोनमध्ये ब्लूटूथ अथवा बॅटरी सेव्हर मोड ऑन असल्यास व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची बेस्ट क्वॉलिटी मिळत नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करण्याआधी ब्लूटूथ आणि बॅटरी सेव्हर मोड ऑफ करा. 

सर्व टिप्स वापरून देखील व्हॉट्सअ‍ॅप कॉलची क्वॉलिटी सुधारत नसेल तर एकदा डिव्हाईस रिस्टार्ट करा.

फोन रिस्टार्ट केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची मजा आणखी वाढेल आणि त्याचा आनंदही घेता येईल.