CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 02:34 PM 2020-05-17T14:34:17+5:30 2020-05-17T14:51:32+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. अशातच आरोग्याची काळजी घेणारा एक हटके रिस्टबँड आला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 47 लाखांवर पोहोचला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले मिळत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. अशातच आरोग्याची काळजी घेणारा एक हटके रिस्टबँड आला आहे.
कोरोना व्हायरसपासून हा रिस्टबँड युजर्सचा बचाव करणार आहे. तसेच हात धुणे, मास्क वापरणे, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगची देखील हा आठवण करून देणार आहे.
कॅनडाच्या कंपनीनं हे रिस्टबँड तयार केला असून तो कोरोनाच्या या संकटात तो लोकांना सातत्याने सतर्क करणार आहे.
ऑफिस अथवा इतर ठिकाणी जर 2 व्यक्ती 6 फूटांपेक्षा कमी अंतरावर एकमेकांच्या जवळ आल्या तर त्यांना हा बँड सावध करणार आहे. रिस्टबँडचा अलार्म वाजेल.
सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी लोकांना एकप्रकारचे रिमांइडर हवे आहे आणि हेच लक्षात घेत हे रिस्टबँड तयार करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल मॅकडोनाल्ड यांनी कंपनीने आतापर्यंत असे दहा हजार रिस्टबँडची विक्री केल्याची माहिती दिली आहे.
द वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार, या रिस्टबँडची किंमत 100 डॉलर आहे. मे अखेरपर्यंत कंपनी या रिस्टबँडची शिपिंग सुरू करू शकते.
फोर्ड आधीपासूनच आपल्या कारखान्यात सॅमसँग स्मार्टवॉचसह प्रयोग करत आहे, जे कर्मचारी एकमेकांच्या जवळ आल्यानंतर त्यांना अलर्ट करतील.
बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये एका बंदरावर काम कराणाऱ्या काही लोकांना युरोपीयन कंपनीमार्फत हातात घालण्यासाठी एक विशेष उपकरण देण्यात आलं आहे, जे घड्याळाप्रमाणे दिसतं आणि त्यांना सावध करतं.