CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 14:30 IST2020-05-03T14:18:31+5:302020-05-03T14:30:09+5:30
मदतीसाठी, तक्रार करण्यासाठी प्रामुख्याने ट्विटरचा वापर हा करता येतो. तसेच संबंधित व्यक्तीला टॅग करण्याची देखील सुविधा देण्यात आलेली असते.

इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र अनेकदा काही जणांना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागत आहे.
लॉकडाऊनमध्ये लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होत आहेत. ट्विटरचाही वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.
मदतीसाठी, तक्रार करण्यासाठी प्रामुख्याने ट्विटरचा वापर हा करता येतो. तसेच संबंधित व्यक्तीला टॅग करण्याची देखील सुविधा देण्यात आलेली असते.
अनेकदा स्लो इंटरनेटमुळे अडचणी निर्माण होतात. मात्र याच दरम्यान युजर्स ऑफलाईन ट्विट करू शकतात.
ऑफलाईन ट्विट करण्यासाठी ट्विटर अकाऊंटसोबत आपला फोन नंबर लिंक असणं गरजेचं आहे
ट्विटरचा शॉर्ट कोड माहीत असणं देखील महत्वाचं आहे. भारतात 9248948837 हा ट्विटरचा शॉर्ट कोड आहे.
ट्विटच्या सपोर्ट पेजवरून युजर 9248948837 या क्रमांकावर मेसेज करून ट्विटरवरचे मेसेज रिसिव्ह करू शकतात.
जो मेसेज टाईप करायचा आहे अथवा जे ट्विट करायचे आहे ते टाईप करून 9248948837 या क्रमांकावर पाठवा त्यानंतर ते ट्विट तुमच्या अकाऊंट वरून पोस्ट केलं जाईल.
भारतात लॉकडाऊन सुरू असताना इंटरनेट डेटा स्पीड कमी होतो. वर्क फ्रॉम होम हे या मागचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
लॉकडाऊनमध्ये व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिसचा वापरही वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांशी संवाद साधत आहेत.