CoronaVirus News : Reliance Jio चा डबल धमाका! जबरदस्त वर्क फ्रॉम होम प्लॅन आणि बरंच काही... By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 06:37 PM 2020-05-08T18:37:15+5:30 2020-05-08T19:11:12+5:30
लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. वर्क फ्रॉम होमची गरज लक्षात घेऊन रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन लाँच केला आहे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे.
वर्क फ्रॉम होम, सिनेमा अथवा व्हिडीओ पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. डेटा लवकर संपल्यानंतर कंटाळा येतो. तसेच स्लो इंटरनेट आणि लिमिटेड डेटाच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे.
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच भन्नाट रिचार्ज प्लॅन आणत असतं. यावेळीही जिओने धमाकेदार वर्क फ्रॉम होम प्लॅन लाँच केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. वर्क फ्रॉम होमची गरज लक्षात घेऊन रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन लाँच केला आहे
रिलायन्स जिओनो एक प्री-पेड प्लॅन लाँच केला आहे. नव्या वर्क फ्रॉम होम प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवस दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.
जिओच्या या नव्या प्लॅनसाठी ग्राहकांना 2,399 रुपये मोजावे लागणार आहेत. 365 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.
वर्क फ्रॉम होम प्लॅनमध्ये डेटासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधाही ग्राहकांना देण्यात आली आहे.
2,399 किमतीच्या प्लॅनसह रिलायन्स जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन देखील लाँच केला आहे.
2,121 किमतीचा वर्क फ्रॉम होमचा आणखी एक प्लॅन असून या प्लॅनची व्हॅलिडीटी ही 336 दिवसांची आहे.
336 दिवस दररोज 1. 5 जीबी डेटा हा ग्राहकांना या प्लॅनमध्ये मिळणार आहे. यासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची देखील सुविधा आहे.
वर्क फ्रॉम होम प्लॅनसह जिओने आणखी काही भन्नाट डेटा प्लॅन्सही ग्राहकांसाठी आणले आहेत.
डेटा प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त डेटा मिळतो. 151 किमतीच्या प्लॅनमध्ये 30 जीबी डेटा मिळणार आहे.
जिओच्या 201 किमतीच्या प्लॅनमध्ये 40 जीबी डेटा तर 251 किमतीच्या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
रिलायन्स जिओसह इतरही टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आहेत. त्याचा भारतीय युजर्सना मोठा फायदा होत आहे.