CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! 'हे' खास हेल्मेट घेणार कोरोना व्हायरसचा शोध; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:23 PM2020-05-21T16:23:38+5:302020-05-21T16:44:16+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे.

जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 329,735 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 50 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 5,090,118 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 2,024,286 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

हेल्मेटच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची माहिती मिळणार असल्याची अनोखी माहिती समोर आली आहे.

इटलीमध्ये हे खास हेल्मेट तयार करण्यात आले असून त्याचा वापर सुरू झाला आहे. स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर बसविण्यात आला आहे.

रोम विमानतळावर प्रवाशांचं स्कॅनिंग हे स्मार्ट हेल्मेट करणार आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हे हेल्मेट तयार करण्यात आले आहे.

भन्नाट हेल्मेटद्वारे विमानतळावरील प्रवाशांचे आणि कर्मचार्‍यांचे तापमान तपासले जाईल. त्यातील कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर शरीरातील तापमानात होणारे बदल सांगणार आहे.

विमानतळावर सुरक्षा अधिकारी स्मार्ट हेल्मेट घालून लोकांना स्कॅन करण्यासाठी उभे राहतील.

हेल्मेटसमोर येऊन प्रत्येक प्रवाशाने आपला चेहरा दाखवायचा आहे. त्यानंतर हेल्मेटमधून शरीरातील तापमान स्कॅन केलं जाणार आहे.

सात मीटर लांबपर्यंत उभ्या असलेल्या तरुणाच्या शरीरातील तापमान स्कॅन करण्याची या हेल्मेटची क्षमता आहे.

रोम हे या हेल्मेटचा वापर करणारं युरोपातील पहिलं शहर आहे.

चीन आणि इटलीतील इंजिनियर्सनी एकत्र येऊन हे हेल्मेट तयार केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - youtube)