Coronavirus : लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा डेटा लवकर संपतो?, ‘या’ ट्रिक्स करतील मदत By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 04:17 PM 2020-03-30T16:17:49+5:30 2020-03-30T16:48:41+5:30
Coronavirus : वर्क फ्रॉम होम, सिनेमा अथवा व्हिडीओ पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे. मात्र स्लो इंटरनेट आणि लिमिटेड डेटाच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे.
वर्क फ्रॉम होम, सिनेमा अथवा व्हिडीओ पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. डेटा लवकर संपल्यानंतर कंटाळा येतो. मोबाईलचा डेटा लवकर संपत असेल तर काही ट्रिक्स आहेत त्या नक्की वापरा.
डेटा सेव्हर ऑन करा स्मार्टफोनमध्ये डेटा सेव्हर फीचर इनेबल करणं हा डेटा युजेस कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डेटा सेव्हर सर्च करा आणि समोर असलेला टॉगल इनेबल करा
बॅकग्राऊंड डेटा यूज कंट्रोल वेगवेगळ्या अॅप्समध्ये बॅकग्राऊंडमध्ये वापरला जाणारा डेटा कंट्रोल करता येतो.
मोबाईल डेटा अँड वायफायवर टॅप करा. त्यानंतर Background Data डिसेबल करा.
स्ट्रीमिंग अॅपच सेटिंग बदला जास्त डेटा खर्च होतो त्यामुळे स्ट्रीमिंग अॅपच सेटिंग बदला.
अॅप सेटिंगमध्ये जाऊन mobile data usage मध्ये जाऊन save data पर्याय सिलेक्ट करा आणि डेटा सेव्हर ऑन करा.
मीडिया ऑटोडाऊनलोड डिसेबल करा Whatsapp वर फोटो, व्हिडिओ आणि मीडिया फाईल्स डाऊनलोड केल्याने जास्त डेटा खर्च होतो.
Setting मध्ये जाऊन Data and storage usage वर टॅप करा. त्यानंतर ऑटो डाउनलोडमध्ये जाऊन when using mobile data पर्यायावर क्लिक करून डिसेबल करा.