ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, घरात 'ही' १ हजार रुपयांखाली किमतीची वैद्यकीय गॅजेट्स जरुर ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 01:48 PM 2021-12-31T13:48:02+5:30 2021-12-31T13:55:49+5:30
Omicron: देशात ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. यातच कोरोना रुग्णांचा आकडा देखील आता लक्षणीयरित्या वाढला आहे. त्यामुळे आपण वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. यासाठी काही उपकरणं खूप महत्वाची ठरतात जी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात.. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता आपल्या घरात काही वैद्यकीय उपकरणं असणं खूप महत्त्वाचं झालं आहे. ही उपकरणं आपण घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करुन मागवू शकता आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. अशाच काही उपकरणांची माहिती आपण आज घेणार आहोत.
Pulse Oximeter कोरोना काळात Pulse Oximeter हे अत्यंत महत्वाचं उपकरण ठरलं आहे. कारण कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण घटतं. श्वास घेण्याची समस्या निर्माण होऊ लागते. अशावेळी आपल्या शरीरातील रक्तातील ऑक्सिजनची पातळी नेमकी किही आहे हे जाणून घेण्यासाठी ऑक्सिमीटर अत्यंत महत्त्वाचं उपकरणं आहे. यामाध्यमातून आपण घरबसल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण जाणून घेऊ शकतो.
Contactless thermometer कोरोनामुळे एकमेकांच्या संपर्कात येणं अत्यंत धोकादायक झालं आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर राखून आपल्याला दैनंदिन आयुष्यात वावरावं लागत आहे. अशावेळी शरीराचं तापमान मोजण्यासाठी कॉन्टॅक्टलेस थर्मामीटरचं महत्त्वं खूप वाढलं आहे. शाररीक स्पर्श टाळून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान Contactless thermometer च्या माध्यमातून जाणून घेता येतं. हे देखील आपल्याला १ हजार रुपयांच्या खालील किमतीत उपलब्ध होऊ शकतं.
Covid-19 Rapid Antigen सेल्फ टेस्ट किट Covid-19 Rapid Antigen सेल्फ टेस्ट किट हे कोणतंही गॅजेट नाही. पण हे घरात असणं आता नक्कीच गरजेचं आहे. या कीटच्या माध्यमातून आपण घर बसल्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याची चाचणी करू शकतो. हे कीट आपल्याला २५० ते ३०० रुपयांमध्ये मिळून जातं.
Nebulizer मशीन Nebulizer मशीनमुळे थेट फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन पोहोचवता येतो. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ऐनवेळी घरातच याचा वापर करुन ऑक्सिजन रुग्णाला देतो येऊ शकतो. हे उपकरण देखील १००० ते १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे
UV Sterilizer UV Sterilizer च्या माध्यमातून आपण आपल्याकडी उपकरणं विषाणूमुक्त ठेवू शकतो. विविध ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यात Stick, बॉक्स किंवा OTG सारख्या डिझाइनचे UV Sterilizer विकत घेऊ शकता.