अलर्ट! Pink WhatsApp अत्यंत धोकादायक; युजर्सना अडकवतंय जाळ्यात, वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:02 PM 2023-07-06T15:02:33+5:30 2023-07-06T15:09:54+5:30
Pink WhatsApp : Pink WhatsApp हे इतकं धोकादायक आहे की ते तुमची संपूर्ण आयुष्यभराची कमाई एका झटक्यात रिकामं करू शकतं. Pink WhatsApp म्हणजे काय आणि त्याचा धोका किती हे जाणून घेऊया... सोशल मीडियावर रोज नवनवीन स्कॅम होत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे लोक सोशल मीडियावर खूप वेळ एक्टिव्ह असतात आणि तिथे येणाऱ्या गोष्टींवर चटकन विश्वास ठेवतात. मात्र आता धोक्याची घंटा वाजली आहे.
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि WhatsAppच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आता युजर्सचं टेन्शन आणखी वाढलंय. कारण यामध्ये आता Pink WhatsApp स्कॅमची भर पडली आहे.
मुंबई पोलिसांनी याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. Pink WhatsApp हे इतकं धोकादायक आहे की ते तुमची संपूर्ण आयुष्यभराची कमाई एका झटक्यात रिकामं करू शकतं. Pink WhatsApp म्हणजे काय आणि त्याचा धोका किती हे जाणून घेऊया...
Pink WhatsApp म्हणजे नेमकं काय? Pink WhatsApp हे थर्ड पार्टी डेव्हलपर्सनी तयार केलेलं WhatsApp एपचं एक क्लोन व्हर्जन आहे. Pink WhatsApp चा मेटाशी कोणताही संबंध नाही. तसेच तुम्हाला Pink WhatsApp गुगल प्ले-स्टोअर किंवा एपलच्या एप स्टोअरवरही मिळणार नाही.
एपीके फाइल सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्याच्या मदतीने लोक App इन्स्टॉल करत आहेत. Pink WhatsApp मध्ये अनेक आकर्षक फीचर्स उपलब्ध आहेत जी ओरिजनल WhatsApp मध्ये उपलब्ध नाहीत. यामध्ये डिलीट केलेले मेसेज पाहता येणार आहेत.
Pink WhatsApp मध्ये कॉलसाठीही सेटिंग करता येते. तुम्हाला कोण कॉल करेल आणि कोण करू शकत नाही हे ठरवता येतं. Pink WhatsApp मध्ये फीचर्स खरोखरच चांगले आहेत पण प्रायव्हसी आणि सिक्योरिटीच्या दृष्टीने ते चांगलं नाही.
हे App तुमची पर्सनल माहिती चोरू शकतं आणि बँक खात्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. Pink WhatsApp बाबत मुंबई आणि तेलंगणा सायबर पोलिसांनी अलर्ट जारी केला असून याच्या लिंकवर क्लिक करू नका, असं म्हटलं आहे.
Pink WhatsApp च्या मदतीने तुमचा फोनही हॅक होऊ शकतो. त्याचा मोयचया फटका बसण्याची शक्यता आहे. दूरवरूनही फोन सहज कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे Pink WhatsApp पासून लांब राहा.
Pink WhatsApp चुकून डाऊनलोड झाल्यास काय करायचं? जर तुम्हीही चुकून फोनवर Pink WhatsApp इन्स्टॉल केलं असेल तर आताच सावध व्हा. हे तुम्ही सहजपणे हटवू शकता. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन एप्समध्ये जा. त्यानंतर पिंक लोगो असलेल्या व्हॉट्सअॅपवर क्लिक करून ते अनइन्स्टॉल करा.