डिजिटल आधार कार्ड करू शकता मोफत डाउनलोड, पाहा सोपी पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:26 IST2025-02-24T16:16:27+5:302025-02-24T16:26:01+5:30
UIDAI आधार कार्ड जारी करते.

आधार कार्ड हे भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे कागदपत्र आहे. देशातील जवळपास ९० टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे. अनेक कामांमध्ये आधार कार्डची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत... प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. याशिवाय, आधार कार्ड नसेल तर अनेक कामे अपूर्ण होऊ शकतात. UIDAI आधार कार्ड जारी करते.
दरम्यान, कधीकधी आधार कार्ड आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणे शक्य नसते. बऱ्याच वेळा लोकांचे आधार कार्ड कुठेतरी हरवले जाते किंवा आपण ते कुठेतरी ठेवतो आणि विसरतो. अशा परिस्थितीत डिजिटल आधार कार्ड हा एक चांगला ऑप्शन आहे.
तुम्ही कुठूनही डिजिटल आधार कार्ड अॅक्सेस करू शकता. तुमच्या फोनवरून किंवा तुमच्या लॅपटॉपवरून अॅक्सेस करू शकता. पण, या डिजिटल आधार कार्डबद्दल अनेकांना माहिती नाही. त्यामुळे डिजिटल आधार कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत जाणून घ्या...
डिजिटल आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला mAadhaar अॅप डाउनलोड करावे लागेल. हे तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. mAadhaar हे डाऊनलोड केल्यानतंर ते अॅप ओपन लागेल.
अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा १२ डिजिटचा आधार नंबर किंवा २८ डिजिटचा EID नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला "Generate OTP" वर क्लिक करावे लागेल.
यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला "Verify" वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला "Download Aadhaar" वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचे आधार डाउनलोड होईल. जे तुम्ही कधीही, कुठूनही अॅक्सेस करू शकता.