Oppo स्मार्टफोन्सवर महाऑफर; फक्त 240 रुपयांमध्ये दमदार मोबाईल उपलब्ध, काही दिवस उरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:41 IST2022-05-20T13:31:07+5:302022-05-20T13:41:11+5:30
ओप्पोच्या चाहत्यांसाठी कंपनीनं खुशखबर आणली आहे. कंपनीनं फ्लिपकार्टवर OPPO Fantastic Days नावाच्या सेलची सुरुवात केली आहे.

या सेलमध्ये ओप्पोच्या अनेक स्मार्टफोन्सवर थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स दिल्या जात आहे.
Oppo F19s
Oppo F19s स्मार्टफोनचा 128GB व्हेरिएंट 22,990 रुपयांच्या ऐवजी 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना 1,000 रुपयांची बचत करता येईल. तर जुना फोन देऊन 18,750 रुपयांची बचत करता येईल. म्हणजे उर्वरित 240 रुपये देऊन हा हँडसेट तुमचा होईल.
Oppo A12
10,990 रुपयांचा हा फोन सेलमध्ये 9,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनी 9,250 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली आहे. त्यामुळे हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन 740 रुपयांमध्ये तुमचा होईल.
Oppo F19 Pro
या फोनचा 256GB व्हेरिएंट 23,490 रुपयांमध्ये विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 25,990 रुपये आहे. यावर 22,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 990 रुपये मोजावे लागतील.
OPPO A53s 5G
18,990 रुपयांच्या ऐवजी हा हँडसेट 15,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. तुम्ही जुना फोन देऊन 14,500 रुपयांची बचत करू शकता. हा फोन 1,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
OPPO A96
23,999 रुपयांच्या ऐवजी OPPO A96 स्मार्टफोन आता 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. यावर 18,750 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे म्हणजे उर्वरीत 1,249 रुपये देऊन हा हँडसेट विकत घेता येईल.