Do you know the benefits of Google's 7 apps?
गुगलच्या या 7 अॅपचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 08:22 PM2017-09-18T20:22:33+5:302017-09-18T20:28:45+5:30Join usJoin usNext गुगल ओपिनियन रिवार्ड्स- गूगलचे हे अॅप इंटरेस्टिंग आहे. यामध्ये युजर काही सर्वेचं उत्तर देतात. याबदल्यात काही क्रेडिट पॉइंट्स मिळतात. या क्रेडिट पॉइंट्सचा वापर करून गुगल प्ले-स्टोअरवर खरेदी करता येते. यामध्ये एक सर्वे पूर्ण करण्यास 24 तासांचा अवधी दिला जातो. (फोटो सौजन्य- गुगल) गुगल फिट- हे अॅप तुमच्या दिवसभरातल्या एक्टिव्हिटीवर नजर ठेवतं तुम्ही किती मजले चढलात, तुम्ही किती वेळ चाललात, किती वेळ बसलात, किती वेळ झोपलात याची नोंद ठेवतं. तुम्ही दिवसभर काय करता हे कळल्यावर आपोआपच तुमचा दिनक्रम बदलतो. गुगल ट्रिप्स- नावानुसारच या अॅपमुळे तुमच्या ट्रिप्सचं प्लॅनिंग करणं सोपं होतं. तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर हे अॅप तुमच्यासाठी कामाचं आहे. यामध्ये ज्या शहराच्या नावासमोर तुम्ही क्लिक कराल त्याबाबतची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. हे अॅप गुगल मॅप्सचा डेटा आणि दुस-या माहितीच्या आधारे युजरसाठी पर्सनलाइज्ड ट्रॅव्हल गाइड तयार करतं. त्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला विमान, कार, हॉटेल्स आदी रिझर्व्हेशनची माहिती एकाच ठिकाणी मिळते. गुगल कीप- गुगल कीप एक नोट-टेकिंग अॅप आहे. यामध्ये पटकन नोट्स घेणं अत्यंत सोपं होतं. या अॅपमध्ये कोडेड नोट्स, टु-डू लिस्ट्स आणि रिमाइंडर्स यांसारखे अनेक फीचर आहेत. या सर्व नोट्स तुमच्या गुगल अकाउंटसोबत लिंक होतात. त्यामुळे कोणत्याही डिव्हाइसमध्ये तुम्ही ते पाहू शकतात. फाइंड माय डिव्हाइस- बऱ्याचदा अनावधानाने आपला मोबाइल कुठे तरी विसरतो किंवा बस, ट्रेन किंवा मार्केटमध्ये चोरीला जातो. आपला मोबाइल म्हणजे स्मार्टफोन आपल्यासाठी एक मिनी कंप्युटरच असल्याने अतिशय महत्त्वाचा डाटा आपण त्यात सेव्ह केला असतो. जर तो मोबाइल चोरीला गेला किंवा हरविला आणि कुणाच्या हाती लागला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आता मोबाइल चोरीला गेला तरी भीती बाळगण्याची गरज नाही, कारण कुणी मोबाईल चोरला, तर तुम्हाला त्याचं लोकेशनही मिळू शकतं. तसंच तुम्ही त्या मोबाइलमधला डेटाही डिलीट करू शकता. Google Drive- गुगल ड्राइव्ह ही गुगलची क्लाऊड सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. जर आपण मोबाइलवर याचे स्वतंत्र अॅप डाऊनलोड केले तर मोबाइलवरही ही सेवा उपलब्ध होऊन मोबाइलमधील फोटो, व्हिडीओज, पीडीएफ फाइल्स आदी गोष्टी आपण सहजपणे ड्राइव्हवर सेव्ह करून ठेवू शकतो. या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर सहज शेअर करू शकतो. तसेच जीमेलवरच्या अटॅचमेंट्स आपण थेट गुगल ड्राइव्हवरच डाऊनलोड करू शकतो. Translate- सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील. ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अॅपची सेवा सुरू केली आहे, त्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलुगु व उर्दू या भाषांचा समावेश आहे. अॅण्ड्रॉइड व आयओएस स्मार्टफोनमध्ये या अॅपचा उपयोग करता येईल. ही सुविधा ऑफलाइनही असणार आहे. म्हणजेच इंटरनेट नसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो.