YouTube वर द्या फक्त 1 तास वेळ; महिन्याला होईल लाखाची कमाई; जाणून घ्या ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:54 PM2022-03-31T19:54:39+5:302022-03-31T20:05:55+5:30

...यासाठी काही टिप्स फॉलो केल्या, तर या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने आपण महिन्याला 100000 रुपयांपर्यंत अथवा त्याहूनही अधिकची कमाई करू शकता

जर आपल्याला खाजगी जॉबमध्ये चांगला पगार मिळत नसेल तर आपण साहजिकच चिंतित असाल. खरे तर, अनेकांना खाजगी नोकरीचे काम कठीण आणि त्या बदल्यात मिळणारा पगार कमी वाटतो. यातच कोरोना काळात अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला आहे आणि त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा स्थितीत मिळणारा पगार कमी वाटणे स्वाभाविकच आहे.

जर आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला आवडत असेल आणि आपण सातत्याने आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असाल, तर हे आपले प्रोफेशनही बनू शकते. मग हे आपल्याला पार्ट टाईम ठेवायचे आहे, की फुल टाईम करायचे आहे, हे आपल्यावर अवलंबून असेल.

यासाठी काही टिप्स फॉलो केल्या, तर आपण या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने महिन्याला 100000 रुपयांपर्यंत अथवा त्याहूनही अधिकची कमाई करू शकता, तेही घरबसल्या यूट्यूबर केवळ एकतास वेळ देऊन. आपल्याला या केवळ गप्पा वाटत असतील, तर तसे नाही. हे सत्य आहे. आपणही यूट्यूबचा वापर करून एवढे पैसे कमवू शकता.

कशापद्धतीने करता येईल कमाई - यूट्यूबच्या माध्यमाने कमाई करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर अपलोड करावे लागतील. हे कुठलेही सामान्य व्हिडिओ नसतील, तर यात आपले कौशल्य आणि काही विशेष असेल. यानंतर आपण यातून लाखो रुपये कमवू शकता. जर आपल्याला हे करण्याचा योग्य मार्ग माहित नसेल तर, आज आम्ही आपल्याला YouTube व्हिडिओ बनवण्याची सर्वोत्तम पद्धत सांगणार आहोत.

बेस्ट व्हिडिओ क्वालिटी आवश्यक - आपल्या YouTube व्हिडिओंची क्वालिटी उत्कृष्ट असेल तर साहजिकच लोक तो अधिकाधिक पाहतील आणि आपले एंगेजमेंटही वाढेल. मात्र, हा व्हिडिओ खराब दर्जाचा असेल, तर अशा व्हिडिओमधून कमाईची संधीही कमी होईल.

कंटेंट दमदार असावा - यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ तयार करताना आपल्याला नेहमीच चांगल्या कंटेंटवर आणि विषयांवर काम करावे लागेल. कारण चांगला कंटेटच अधिकाधीक लोकांना आल्याशी जोडेल. यामुळे आपले युजर्सदेखील वाढतील आणि आपल्याला व्ह्यूज देखील चांगले मिळतील.

व्हिडिओ 3 मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा नसावा - आपण यूट्यूबसाठी व्हिडिओ तयार करत असाल आणि पैसे कमावणे हाच याचा हेतू असले, तर आपल्या व्हिडिओची साईट 3 मिनिटांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. कारण आपल्या व्हिडिओची साईज 3 मिनिटांपेक्षा कमी असेल, तर आपल्याला या व्हिडिओपासून कमाई करता येणार नाही. यामुळे आपला व्हिडिओ नेहमीच 3 मिनिटांपेक्षा अधिक मोठा असणे आवश्यक आहे.

सातत्य आवश्यक - सुरुवातीला आपण एका दिवसात एक व्हिडिओ पोस्ट करू शकता. मात्र, आपल्याला अधिक एंगेजमेंट हवे असेल, तर आपण रोज किमान दोन व्हिडियो पोस्ट करायला हवेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, यात सातत्य असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा एंगेजमेंट कमी होईल.