मेमरी फुल झाल्यामुळे फोन हँग होतोय का? असं करा स्टोरेज कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 13:28 IST2019-04-03T12:56:24+5:302019-04-03T13:28:10+5:30

स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र अनेकदा इंटरनल स्टोरेज फुल झाल्यास स्मार्टफोन स्लो होतो. तसेच फोन सतत हँग होण्यास सुरुवात होते. स्मार्टफोनमधील स्टोरेज कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.
फोनची कॅश मेमरी क्लिअर करा
फोनची कॅश मेमरीमध्ये अनेक गोष्टी या सेव्ह होत असतात. त्यामुळे अनेकदा फोनमधील स्टोरेज फुल होतं. अॅप्स आणि वेबसाईट लोडींगच्या वेळी जास्त डेटा कॅश होतो. अशावेळी फोनच्या सेटींगमध्ये जाऊन कॅश मेमरी डिलीट करून फोन मेमरी रिकामी करू शकता. Settings --> Storage & USB--> Internal Storage-->Cached Data अशा पद्धतीने तुम्ही फोनमधील स्टोरेज कमी करू शकता.
फोनमधील फोटोची साइज कमी करा
फोनच्या कॅमेऱ्याचा पिक्सल जास्त असल्याने फोनमधून काढलेल्या फोटोची साइज ही मोठी असते. हे सर्व फोटो फोनमध्ये सेव्ह करण्याची गरज नाही. तुम्हाला हवं असल्यास क्लाउड स्टोरेज अॅप्स किंवा गुगल फोटोजसोबत कनेक्ट करून फोटोंचा बॅकअप घेऊ शकता. यानंतर ते फोटो फोनमधून डिलीट करता येतील. यामुळे फोनच्या मेमरीमध्ये जागा शिल्लक राहील.
वापरत नसलेले अॅप्स डिलीट करा
स्मार्टफोनमध्ये आपण गुगल प्ले स्टोअरवरून अनेक अॅप डाऊनलोड करतो. मात्र ते सर्वच अॅप हे नेहमी वापरले जात नाहीत. असे वापरत नसलेले अॅप फोनमधून डिलीट करा.
व्हिडीओ कमी करा
फोनमध्ये सर्वात जास्त जागा ही व्हिडीओसाठी वापरली जाते. फोनमधील फोटोप्रमाणे क्लाऊडवर याचा बॅकअप घेऊन ते नंतर फोनमधून डिलीट करा. अशा पद्धतीने तुम्ही फोन स्टोरेज कमी करू शकता.
डाऊनलोड डिलीट करा
फोनमधील स्टोरेज फ्री करण्यासाठी फोनच्या सेटींगमध्ये जाऊन डाऊनलोडमध्ये जा. जर येथे एखादी मोठी फाईल डाऊनलोड केली असेल तर ती डिलीट करा. फोनमध्ये डाऊनलोड केलेल्या अनेक फाईल या त्यानंतरही फोनमध्येच असतात. त्यामुळे नको असलेल्या फाईल डीलीट करा.