‘हे’ काम करा नाही तर बंद होईल तुमचं Facebook अकाऊंट; कंपनीच्या ई-मेलकडे करू नका दुर्लक्ष By सिद्धेश जाधव | Published: March 19, 2022 05:03 PM 2022-03-19T17:03:47+5:30 2022-03-19T17:13:25+5:30
फेसबुकनं काही दिवसांपूर्वी काही युजर्सना Facebook Protect अॅक्टिव्हेट करण्यास ई-मेल पाठवून सांगितले होते. ज्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केलं त्यांचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. Fecebook अकाऊंटमध्ये लॉगिन करता येत नसल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आल्या आहेत. या युजर्सना सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत ते Facebook Protect अॅक्टिव्हेट करत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्यांचं अकाऊंट अॅक्सेस करता येणार नाही.
फेसबुकनुसार, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ग्लोबली रोल आऊट झालेला Facebook Protect एक एक सिक्योरिटी प्रोग्राम आहे. Facebook Protect युजर्सना त्यांचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो.
हे फिचर खासकरून हॅकर्सच्या निशाण्यावर असलेल्या युजर्ससाठी सादर करण्यात आलं आहे. ज्यात पत्रकार, सरकारी कर्मचारी आणि मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या समाजसेवकांचा समावेश आहे.
फेसबुकनं काही दिवसांपूर्वी security@facebookmail.com या अॅड्रेसवरून मेल पाठवला होता. यातून हे फिचर अॅक्टिव्हेट करण्यास सांगितले होते. ज्यांनी या मेलकडे दुर्लक्ष केलं त्यांचं अकाऊंट कंपनी बंद करत आहे.
अकाऊंट परत मिळवण्यासाठी Facebook Protect ऑन करावं लागेल. ट्विटरवर एका युजरनं अशी तक्रार केली आहे की, आलेला मेल स्पॅम वाटत होता.
असं करा Facebook Protect अॅक्टिव्हेट Facebook Protect अॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वप्रथम फेसबुक अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जा. इथे तुम्हाला Security and Login चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप केल्यानंतर Facebook Protect वर क्लीक करा. त्यानंतर स्क्रीनवरील स्टेप्स फॉलो करून तुमची सुरक्षा अॅक्टिव्हेट करा.